तरुण भारत

सिंधू उपांत्यपूर्व फेरीत, लक्ष्य सेनची विजयी सलामी

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सायना नेहवाल, एचएस प्रणॉय, परुपल्ली कश्यप यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त

वृत्तसंस्था /ओडेन्सी (डेन्मार्क)

Advertisements

येथे सुरू झालेल्या डेन्मार्क खुल्या सुपर 1000 पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूने महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरूष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनने विजयी सलामी दिली. या स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल, एच.एस. प्रणॉय आणि पी. कश्यप यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

दोनवेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱया भारताच्या पी.व्ही. सिंधूने गुरूवारी झालेल्या महिला एकेरीच्या अटीतटीच्या सामन्यात थायलंडच्या बुसानेनचा 21-16, 12-21, 21-15 अशा तीन गेम्स्मधील लढतीत 67 मिनिटात पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळविणाऱया सिंधूची ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.

महिला एकेरीच्या दुसऱया एका सामन्यात जपानच्या 20 व्या मानांकित आया ओहरीने भारताच्या सायना नेहवालचा 21-16, 21-14 अशा सरळ गेम्स्मध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक मिळविणाऱया सायना नेहवालला नुकत्याच झालेल्या उबेर चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत स्नायू दुखापतीमुळे पहिल्याच सामन्यातून माघार घ्यावी लागली होती.

पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने आपलाच राष्ट्रीय सहकारी सौरभ वर्माचा 21-9, 21-7 असा पराभव करत विजयी सलामी दिली. सेनने हा सामना 26 मिनिटात जिंकला. मात्र दुसऱया एका सामन्यात भारताच्या एच.एस. प्रणॉयचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित जोनाथन ख्रिस्टीने प्रणॉयचा 21-18, 21-19 असा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात 2014 राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पी. कश्यपला दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले. चीन तैपेईच्या चौथ्या मानांकित चेनने कश्यप माघार घेतल्याने दुसरी फेरी गाठली.

विश्व दुहेरीच्या सामन्यात चीनच्या फेंग झी आणि युई यांनी भारताच्या सात्विक साईराज आणि अश्विनी पोनप्पा यांचे आव्हान 21-17, 14-21, 21-11 असे संपुष्टात आणले.

त्याचप्रमाणे महिलांच्या दुहेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या नीता मारवा आणि पुत्री सियाक यांनी भारताच्या मेघना आणि पूर्वीशा यांचा 21-8, 21-7 असा पराभव केला.

अन्य एका सामन्यात कोरियाच्या ली सोही आणि एस शीन या जोडीने भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि एन सिकी रेड्डी यांच्यावर 21-17, 21-13 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Related Stories

व्हॉलीबॉल नेशन्स लिग स्पर्धा रद्द

Patil_p

जोकोविचला हरवून नदाल अजिंक्य

Patil_p

‘सुवर्ण’स्वप्न भंगले; आता कांस्य पदकाची आशा

datta jadhav

गोवा किंवा केरळमध्ये होणार आयएसएल

Patil_p

यजमान न्यूझीलंडची विजयी सलामी

Patil_p

पॅरालिम्पिक्ससाठी भारताचे पहिले पथक रवाना

Patil_p
error: Content is protected !!