तरुण भारत

आयर्लंड-नामिबिया आज महत्त्वाची लढत

वृत्तसंस्था /शारजाह

येथे शनिवारपासून सुरू होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 12 संघांत स्थान मिळविण्यासाठी पात्रता फेरीचे सामने खेळविले जात आहेत. शुक्रवारी येथे अ गटातील आयर्लंड-नामिबिया यांच्यात शेवटच्या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होईल. या सामन्यात दोन्ही संघांना विजयाची नितांत गरज आहे.

Advertisements

पात्रता फेरीच्या सामन्यात आयर्लंड आणि नामिबिया या दोन्ही संघांना लंकेकडून पराभव पत्करावा लागला आहे तर या दोन्ही संघांनी हॉलंडवर विजय मिळवत प्रत्येकी समान दोन गुण मिळविले आहेत.

अ गटातून लंका संघाने यापूर्वीच सुपर 12 संघातील आपला प्रवेश निश्चित केला आहे तर हॉलंडचे आव्हान यापूर्वी संपुष्टात आले आहे. आता या गटातून सुपर 12 संघात प्रवेश करणाऱया दुसऱया संघासाठी शुक्रवारच्या सामन्यात आयर्लंड आणि नामिबिया यांना विजयाची नितांत गरज आहे. या सामन्यात विजय मिळविणारा संघ सुपर-12 फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

आयर्लंड संघाचे नेतृत्व विल्सन करीत असून नामिबियाचे नेतृत्व इरासमूस करीत आहेत. नामिबियाच्या तुलनेत आयर्लंडची फलंदाजी आणि गोलंदाजी किंचित वरचढ वाटते. आयर्लंड संघातील कॅम्फर, लिटल आणि ऍडेर हे प्रमुख गोलंदाज आहेत. शारजामध्ये होणाऱया या सामन्यात खेळपट्टी संथ असल्याने दोन्ही संघांतील गोलंदाजांची सत्वपरीक्षा ठरेल.

Related Stories

केन विल्यम्सनचे चौथे द्विशतक

Patil_p

भुवनेश्वर, लिझेली ली मार्चमधील सर्वोत्तम खेळाडू

Patil_p

20 किमी रेस वॉकमध्ये इटलीचे ‘डबल’

Patil_p

तामिळनाडू संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिककडे

Omkar B

युवराज सिंगचे सलग 4 षटकार

Patil_p

बेलारूस ऑलिंपिक समिती अध्यक्ष लुकाशेंकोवर बंदीची कारवाई

Patil_p
error: Content is protected !!