तरुण भारत

बांगलादेश सुपर-12 फेरीसाठी पात्र

वृत्तसंस्था /अल अमेरात

अष्टपैलू शकीब हसनच्या धडाकेबाज प्रदर्शनाच्या बळावर बांगलादेशने पात्रता फेरीत दुबळय़ा पीएनजी संघाचा 84 धावांनी धुव्वा उडवत आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 फेरीसाठी पात्रता मिळवली. बांगलादेशच्या खात्यावर 4 गुण असून त्यांची धाव सरासरी देखील 1.733 अशी उत्तम राहिली.

Advertisements

या पात्रता फेरीतील पहिल्या लढतीत त्यांना स्कॉटलंडविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. मात्र, ते अपयश मागे सारत बांगलादेशने मुख्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

‘टायगर्स’ बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 181 धावांचा डोंगर रचला. कर्णधार महमुदुल्लाह (28 चेंडूत 50) व शकीब हसन (37 चेंडूत 46) यांनी धडाकेबाज फलंदाजी साकारली. त्यानंतर शकीबने बांगलादेशच्या महान क्रिकेटपटूंमध्ये आपल्याला का गणले जाते, याचे प्रत्यंतर आणून देताना 9 धावात 4 फलंदाज गारद केले. पीएनजी संघ 19.3 षटकात अवघ्या 97 धावांमध्ये गारद झाला.

‘स्कॉटलंडविरुद्धचा पराभव धक्कादायक होता. पण, टी-20 क्रिकेटमध्ये ज्या दिवशी जो संघ सरस खेळतो, तोच विजयी होतो. आता मात्र सलग दोन विजयांसह आम्ही मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलो आहोत. मुख्य स्पर्धेत अनुभव पणाला लावून खेळण्याचा आमचा निर्धार आहे’, असे शकीबने सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर नमूद केले.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : 20 षटकात 7 बाद 181 (शकीब हसन 37 चेंडूत 46, महमुदुल्लाह 28 चेंडूत 50, लिटॉन दास 23 चेंडूत 29. मोरिया, डॅमिएन, असद प्रत्येकी 2 बळी, सिमॉन 1-6).

पीएनजी : 19.3 षटकात सर्वबाद 97 (किपलिन डोरिगा 34 चेंडूत नाबाद 46. शकीब हसन 4-9, तस्कीन, सैफुद्दिन प्रत्येकी 2 बळी, मेहदी हसन 1-20).

Related Stories

केएसए लीगवर प्रॅक्टीस (अ) चा सलग दुसऱयांदा कब्जा 

Abhijeet Shinde

पाकच्या शदाब खानला दुखापत

Patil_p

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यजमानपदासाठी अमेरिका उत्सुक

Patil_p

अल्जेरियन टेनिसपटूवर आजीवन बंदी

Patil_p

शदमन इस्लामचे अर्धशतक, वारिकनचे 3 बळी

Patil_p

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा विजयाचा डबल बार!

datta jadhav
error: Content is protected !!