तरुण भारत

अनगोळ काळा तलावाचे अस्तित्व धोक्यात

तलाव परिसरात अतिक्रमण : विकासाच्या नावाखाली भकासाचे राजकारण

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. अत्याधुनिक शेतीकडे शेतकऱयांना वळविण्याचा प्रयत्न शासन करत आहे. मात्र पाण्यासाठी असलेल्या तलावांकडेच दुर्लक्ष होत आहे, असा आरोप अनगोळ परिसरातील नागरिकांतून होत आहे.

विकासाला चालना देण्याच्या नावाखाली तलावांचे सौंदर्यीकरण करून लाखो रुपये खर्च केले जात आहेत. मात्र यामुळे तलावांमध्ये अतिक्रमण होत आहे. अनगोळमधील काळा तलावही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी मोठा खर्च करण्यात येत आहे. मात्र पुन्हा या तलावामध्ये जलपर्णी वाढतच चालली आहे. तलावाची खोदाईही अर्धवट आहे. त्यामुळे या तलावाचे अस्तित्व धोक्मयात आले आहे. या तलावाला जिवंत झरे आहेत. मात्र माती टाकून हे झरे बंद केले जात आहेत. नको त्या ठिकाणी माती टाकून तसेच तलावाचा बांध रुंदीकरण केला जात आहे. काही ठिकाणी तर भर तलावातच माती टाकण्यात येत आहे. त्यामुळे हा तलाव बुजण्याच्या परिस्थितीत आहे. माती टाकण्यामागचे नेमके कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलावाच्या काठावर ट्रक्टरने माती टाकली गेली आहे. ती कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आली आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तलावामध्ये अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण हटविणे महत्त्वाचे आहे. तलावाचा पूर्ण सर्व्हे करून तलावाच्या परिसरात झालेले अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे. सध्याची परिस्थिती पाहता तलावाचे अस्तित्वच धोक्मयात आले असून तातडीने याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.

Related Stories

पुनीत राजकुमारला पद्मश्री पुरस्कार द्या

Sumit Tambekar

कला आयुष्यभर आनंदित ठेवते

Patil_p

विमानतळ ते शहरापर्यंत फेरीबससेवेला मुहूर्त कधी?

Amit Kulkarni

अश्विनी शिंदे यांना पीएचडी प्रदान

Patil_p

तान्हुल्यासह बेळगाव विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

Patil_p

कर्नाटक: कोरोना आणि पावसाच्या दरम्यान नागरिकांनी सावधगिरी बाळगा: मंत्री सुधाकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!