तरुण भारत

शिवाजीनगरमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित स्पर्धेत 208 विद्यार्थ्यांचा सहभाग

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

संयुक्त छत्रपती श्री शिवाजीनगर यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित लेखी प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली. प्रत्येकांनी शिवचरित्राचे अनुकरण करावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा शिवाजीनगर मर्यादित होती. या स्पर्धेमध्ये एकूण 208 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्याचदिवशी सायंकाळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

प्रमुख पाहुणे म्हणून वॉर्ड क्रमांक 14 मधील नवनिर्वाचित नगरसेवक शिवाजी मंडोळकर, ज्येष्ट समाजसेवक व पंच अध्यक्ष पांडुरंग चिगरे, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लोजी पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रचारक व सिद्धेश्वर गो शाळेचे संस्थापक हिरामणी मुचंडीकर, युवा समितीचे उपाध्यक्ष व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभाग प्रमुख अंकुश केसरकर, भगवे वादळ युवक संघाचे अध्यक्ष प्रसाद मोरे, सामाजिक कार्यकर्ते मल्लेश बडमंजी तसेच मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय विठ्ठल उपस्थित होते.

प्रमुख वक्ते म्हणून हिरामणी मुचंडीकर व प्रसाद मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व या स्पर्धेबद्दल आपले विचार मांडले. या स्पर्धेच्या निमित्ताने संयुक्त छत्रपती श्री शिवाजीनगर यांच्यावतीने सर्वम बाळेकुंद्री या बाळासाठी 26,203 रुपयाचा निधी लोकवर्गणीतून जमा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी राहुल चव्हाण, विक्रांत जाधव, सुहास पवार यांनी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुनील लोहार यांनी केले. आभार प्रदर्शन राधिका पाटील हिने केले. ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

लहान गट-सलोनी आंबेवाडीकर, नंदिनी गावडे, मिताली कदम, श्रेया पाटील, तन्वी पाटील, पियुष पाटील, रिद्धी गावडे यांनी यश संपादन केले. मोठय़ा गटामध्ये-वैजनाथ पाटील, हरिष पाटील, पांडुरंग नरेवाडकर, ओमकार तुर्केवाडी, साक्षी मोर्डेकर, शुभम शिरगावकर, गौरव हिंडलगेकर यांनी यश संपादन केले आहे.

Related Stories

शहर परिसराला पावसाने झोडपले

Patil_p

विश्रुत स्ट्रायकर्स, डीके लायन्स संघ विजयी

Amit Kulkarni

टोल चुकला; पण जीवाला मुकला

Amit Kulkarni

केएलई बीसीएमध्ये हनीवेल सेंटरचे उद्घाटन

Amit Kulkarni

आयपीएलवर बेटिंग घेताना चौघांना अटक

Patil_p

पोलीस आले आणि खवय्ये मटण टाकून पळाले

Patil_p
error: Content is protected !!