तरुण भारत

रुमेवाडी क्रॉस-करंबळ क्रॉस रस्त्याची पुन्हा दयनीय अवस्था

खड्डय़ांतून पाणी साचल्याने दुचाकी वाहने चालविणे धोकादायक

प्रतिनिधी /खानापूर

Advertisements

बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी रुमेवाडी क्रॉस ते करंबळ कत्रीपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर दररोज एक-दोन अपघात होत असून खड्डय़ांच्या साम्राज्यामुळे वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. आमदार अंजली निंबाळकर यांच्या सूचनेनुसार काँग्रेस कार्यकर्त्यांनी तसेच करंबळ येथील युवकांनी श्रमदान करून या ठिकाणचे खड्डे बुजवले होते. यामुळे वाहनचालकांना होणारा त्रास काही प्रमाणात दूर झाला होता.

आता पुन्हा या मार्गावर पूर्वीप्रमाणेच खड्डे पडले असून दुचाकी तसेच चार चाकी वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. चार-पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पण रुमेवाडी क्रॉसपासून जवळच असलेल्या एका मोठय़ा खड्डय़ात आजूबाजूच्या परिसरातील पाणी येऊन साचत असल्याने त्या ठिकाणी डबक्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्या डबक्यात साचलेल्या पाण्यातून दुचाकी, चार चाकी वाहने चालविताना कसरत करावी लागत असून वाहन जाताना त्यामधील पाणी उडून पादचाऱयांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच खड्डय़ात पुन्हा एकदा दुचाकींचे किरकोळ अपघात वाढले आहेत.

या खड्डय़ांची वेळीच दखल न घेतल्यास या ठिकाणी केव्हा अपघात घडेल, याची शाश्वती नाही. याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याची तातडीने दखल घेऊन रुमेवाडी कॉस ते करंबळ कत्रीपर्यंतचे खड्डे कायमस्वरुपी बुजवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

जिल्हय़ात 14 जणांना कोरोनाची लागण

Amit Kulkarni

महापौर निवड कोणत्या आरक्षणानुसार?

Omkar B

आंबेवाडीत मसणाई मंदिराचे भूमिपूजन

Patil_p

वादळी पावसामुळे शेतकऱयांचे लाखोंचे नुकसान

Amit Kulkarni

अलोन स्पोर्ट्स उपांत्य फेरीत

Patil_p

शिरसी बंद हाकेला काही एक संबंध नाही!

Amit Kulkarni
error: Content is protected !!