तरुण भारत

हिंडलगा शाळेत प्रयोगालय-ग्रंथालयाची स्लॅबभरणी

प्रतिनिधी /बेळगाव

हिंडलगा येथील सरकारी आदर्श मराठी शाळेच्या प्रयोगशाळा व ग्रंथालय इमारतीचा स्लॅब भरणी कार्यक्रम व नूतन ग्राम पंचायतीच्या सदस्यांचा सत्कार  असा संयुक्त कार्यक्रम शाळेच्या सभागृहात नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष युवराज अगसगेकर होते.

Advertisements

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. ग्रा. पं. माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य रामचंद्र मन्नोळकर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन झाले. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावतीने त्यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर हे उपस्थित होते.

 विविध रोपे देऊन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यासाठी डॉ. अरुणा पावशे यांनी विशेष परिश्रम घेतले असून त्यांच्या मातोश्री सुधा पावशे यांचा तसेच मृणाल हेब्बाळकर, जिल्हा पंचायत माजी सदस्या माधुरी हेगडे, तालुका पंचायत माजी सदस्या काजल महागावकर, बेळगाव ग्रामीण भाजप अध्यक्ष विनय कदम, पत्रकार अनंत कंग्राळकर, अभियंता अवधूत सायनेकर यांचा एसडीएमसी सदस्यांच्या हस्ते रोप देऊन सत्कार करण्यात आला.

ग्रा. पं. माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, तालुका पंचायत माजी सदस्य व विद्यमान ग्रा. पं. सदस्य रामचंद्र कुदेमनीकर, ग्रा. पं. सदस्य विठ्ठल देसाई, छायाचित्रकार व ग्रा. पं. सदस्य डी. बी. पाटील, यल्लाप्पा काकतकर, नामदेव पाटील, नितीनसिंह रजपूत, राहुल उरणकर, गजानन बांदेकर, परशराम कुडचीकर, अशोक कांबळे, आरती कडोलकर, सुमन राजगोळकर, संगीता पलंगे, चेतना राजगोळकर, चेतना अगसगेकर, मिनाक्षी हित्तलमनी, सीमा देवकर, रेणू गावडे, उमा सोनवडेकर, लक्ष्मी परमेकर, प्रेरणा मिरजकर, रेणुका भातकांडे, अलका कित्तूर, स्नेहल कोलेकर यांचा सत्कार करण्यात आला.

आर्थिक मदत लवकरच

सर्वांच्या सहकार्यातून मराठी शाळा आदर्श शाळा बनवूया, असे आवाहन डी. बी. पाटील यांनी केले. ग्राम पंचायत शक्मय ते सर्व सहकार्य देईल व सुधा मूर्ती फौंडेशनकडून मिळणारी आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून दिली जाईल, असे आश्वासन रामचंद्र मन्नोळकर यांनी दिले. शाळेसाठी स्मार्ट वर्गखोली लवकरच उभारून दिली जाईल. त्याचबरोबर अरुणा पावशे यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत लवकरच दिली जाईल, असे आश्वासन मृणाल हेब्बाळकर यांनी दिले.

प्रास्ताविक व स्वागत शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका बी. एन. बाळेकुंद्री यांनी केले. सूत्रसंचालन सागर हराडे तर सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन ए. एच. यळ्ळूरकर यांनी केले. एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्षा, त्याचबरोबर सर्व सदस्यांनी सर्व कार्यक्रमाची धुरा सांभाळून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

Related Stories

निपाणी उद्यापासून अंशतः चालू; या सेवा राहणार सुरू

Abhijeet Shinde

फिशमार्केट गाळय़ांच्या लिलाव प्रक्रियेवेळी गोंधळ

Patil_p

कारवार जिल्हय़ात रंगोत्सव साधेपणाने

Amit Kulkarni

समाजाप्रती संवेदनशील असणाऱया डॉ.कीर्ती शिवकुमार

Patil_p

पहावे तेथे शुकशुकाटच !

Patil_p

आयसीएमआर, बिम्स-किम्समध्ये समन्वय करार

Amit Kulkarni
error: Content is protected !!