तरुण भारत

लैला शुगर्सचा पहिला हप्ता 2500 रु.जाहीर

यंदाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ : 5 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : महालक्ष्मी ग्रुप यापुढे कारखाना स्वबळावर चालविणार

वार्ताहर /खानापूर

Advertisements

येथील तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला शुगर साखर कारखान्याच्या 2021-22 सालातील गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी पार पडला. महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व लैला शुगर्सचे चेअरमन विठ्ठल हलगेकर यांनी या हंगामात 5 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून शेतकऱयांना पहिला हप्ता 2500 रुपये तर दुसरा हप्ता 100 रुपयेपेक्षा अधिक देणार असल्याचे घोषित केले.

 यावेळी विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते वजन काटय़ाचे पूजन करण्यात आले. शेतकरी व नेते मंडळींच्या हस्ते गव्हाणीत ऊस टाकून हंगामाला चालना देण्यात आली. यावेळी प.पू. चन्नबसव देवरू अवरोळी मठ यांच्या दिव्य सानिध्यात विठ्ठल हलगेकर, मल्लिकार्जुन वाली, संजय कुबल, प्रमोद कोचेरी, अशोक यमकनमर्डी, प्रतापराव सरदेसाई, धनश्री सरदेसाई आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

कारखाना स्वबळावर चालवणार

 यावेळी विठ्ठल हलगेकर म्हणाले, 2018 पासून लैला शुगर महालक्ष्मी ग्रुपच्या माध्यमातून चालविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. कारखान्याची भौगोलिक स्थिती, भाग्यलक्ष्मीचे खासगीकरण करून लैला शुगर्सच्या नावे आंध्रा कंपनीने चालवताना आलेल्या अडचणी व महालक्ष्मी ग्रुपने चालवण्यासाठी घेतलेली जबाबदारी याचा आढावा मांडला. 2018 नंतर आंध्रा कंपनी व महालक्ष्मी ग्रुपच्या मध्यस्थीतून बिले देताना अडचणींवर मात करून पुढे जावे लागले. या वषीपासून 15 वर्षांसाठी कारखाना महालक्ष्मी ग्रुप शेतकऱयांच्या सहकार्यातून स्वबळावर चालवणार आहे. कारखान्याचे विस्तारीकरण करून उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न आहे. यावषी 5 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. दररोज 5 हजार टन गाळप क्षमता वाढविण्यात आली असून शेतकऱयांनी ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पहिला हप्ता पंधरा दिवसात

 उपस्थित शेतकऱयांनी मागील गळीत हंगामातील दुसरा हप्ता द्यावा तसेच यावषी किमान 2800 रुपये द्यावेत, अशी मागणी केली. यावर बोलताना हलगेकर यांनी मागील वषीच्या एफआरपी दराला अनुसरून 2500 रुपये दर दिला असून मागील कोणतीही थकबाकी शिल्लक ठेवली नाही. यावषी सरकारने लैला शुगर कारखान्याचा एफआरपी दर 3341 रुपये जाहीर केला आहे. यामध्ये तोडणी व वाहतूक वजा जाता शेतकऱयांना दर देणेचा नियम आहे. त्यानुसार पहिला हप्ता 2500 रुपये व दुसरा हप्ता 100 रुपये पेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न आहे. यावषी कारखान्याची एकूण गाळप क्षमता तसेच साखरेचा उतारा यावर दुसऱया हप्त्याचा दर निश्चित केला जाणार आहे. यासाठी शेतकऱयांनी अधिकाधिक ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन केले.

स्वर्गीय निळकंठराव सरदेसाई यांचा पुतळा कारखाना स्थळावर उभारणार

कारखान्याच्या उभारणीसाठी माजी आमदार स्वर्गीय निळकंठराव सरदेसाई यांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांची आठवण कायम राहावी यासाठी कारखाना स्थळावर त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय व्यवस्थापन मंडळाने घेतल्याचे सांगितले.

यावेळी व्यासपीठावरून भाजप नेते संजय कुबल, प्रमोद कोचेरी, पत्रकार प्रकाश देशपांडे, जि. पं. माजी सदस्य विलास बेळगावकर, प्रताप सरदेसाई, अशोक यमकनमर्डी, मल्लिकार्जुन वाली, गुरुलिंगय्या पुजार, धनश्री सरदेसाई आदींची भाषणे झाली. मठाधीश चन्नबसव देवरू यांनीही आशीर्वचन केले. यावेळी कुप्पटगिरी, बलोगा, दोड्डहोसूर पंच मंडळींचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष ए. मुरली, कारखान्याचे सीईओ मोहन हिरेमठ, तुकाराम कुलम, रामचंद्र खांबले, नारायण पाटील, वासुदेव नांदुरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक नेते व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. स्वागत व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील यांनी करून कारखान्याचा आढावा मांडला. सूत्रसंचालन पिराजी कुऱहाडे यांनी, प्रास्ताविक शेतकी अधिकारी बाळासाहेब शेलार यांनी तर आभार सीईओ हिरेमठ यांनी मानले.

Related Stories

आमदार आणि माजी महापौरांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

रविवारी जिल्हय़ात 194 नवे रुग्ण

Patil_p

कुटुंबियांनी घेतली विनय कुलकर्णी यांची भेट

Patil_p

भाजीपाला महागला

Patil_p

धोकादायक इमारतींकडे अक्षम्य दुर्लक्ष

Omkar B

तालुक्याच्या पश्चिम भागात चुरशीने 86 टक्के मतदान

Patil_p
error: Content is protected !!