तरुण भारत

नोटा छपाई मशीनसह टोळके गजाआड

रायबाग तालुक्यात कारवाई : रक्कम दुप्पट करण्याचे आमिष : टोळके गोकाक तालुक्यातील

वार्ताहर /रायबाग

Advertisements

रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱया चौघा जणांच्या टोळक्याला रायबाग पोलिसांनी गजाआड केल्याची घटना नुकतीच घडली. एका महिलेसह चौघाजणांचा सहभाग असलेले टोळके गोकाक तालुक्यातील आहे. त्यांच्याकडून नोटा छापण्याचे मशीन, मोबाईल संच, 59 हजार रुपयांची रोकड, छपाई साहित्य व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. असिफ बळीगार (वय 26,), गजानन नाईक (वय 31), सलील सय्यद (वय 25) तिघेही राहणार घटप्रभा तर मेहरुन सरकवास (वय 32 रा. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी, गजानन नाईक, मेहरुन सरकवास, असिफ बळीगार व सलील सय्यद हे चौघेजण रायबाग रेल्वे स्टेशन येथील रहिवासी रमेश कृष्णा घोरपडे यांना रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून रमेश यांनी सदर टोळक्याला 25 हजार रुपये दिले होते. बरेच दिवस उलटूनही दुप्पट रक्कम मिळाली नसल्याने रमेश यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. मात्र रक्कम देण्यात नेहमी टाळाटाळ करण्यात येत होती.

याबाबत रमेश यांना फसवणुकीचा संशय आल्याने सदर चौघांविरोधात रायबाग पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. रायबागचे सीपीआय एच. डी. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकार्य हाती घेण्यात आले. यानुसार एएसआय भरमा वडेयर, एस. वाय. तळवार, आर. बी. खानापुरे, एस. एस. चौधरी, सी. बी. पाटील यांनी कारवाई करत रायबाग येथून चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईप्रसंगी त्यांच्याकडून नोटा छपाई मशीन, लाकडी पेटी, इलेक्ट्रीक साहित्य, मोबाईल संच, 59 हजार रुपयांची रक्कम व दुचाकी जप्त केले. दरम्यान सदर चोरटे गोकाक तालुक्यातील असून गोकाक व रायबाग तालुक्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून अन्य कोणाची फसवणूक केली आहे का? याचा तपास रायबाग पोलीस करत आहेत.

Related Stories

मार्कंडेयमध्ये 27,215 क्विंटल साखर उत्पादन

Patil_p

पिरनवाडीत पुतळा बसवण्यावरून वाढला तणाव

Rohan_P

थेट रेशन वितरणाला दुकानदारांचा विरोध

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात आणखी चौघांची भर

Rohan_P

नागेश चौगुले यांचा सन्मान

Amit Kulkarni

मण्णूरला जोडणाऱया मुख्य रस्त्याची दुर्दशा

Amit Kulkarni
error: Content is protected !!