तरुण भारत

धर्मांतर करणाऱयांवर कठोर कारवाई करा

जिल्हाधिकाऱयांना जैन बांधवांचे निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

जैन धर्मियांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न ख्रिश्चन धर्मियांनी केला आहे. कित्तूर तालुक्मयातील तिगडोळी गावामध्ये हा प्रकार घडला आहे. अनेक ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे जैनधर्मिय दहशतीखाली आहेत. तेव्हा अशाप्रकारे दडपशाही करणाऱयांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जैनधर्मिय बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदनाद्वारे केली.

जैन युवा संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कित्तूर, बैलहोंगल तालुक्मयामध्ये जैनधर्मियांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो थांबवावा, अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर धर्मांतरविरोधी कायदा तातडीने कर्नाटकात अंमलात आणावा, येत्या अधिवेशनामध्ये हा कायदा संमत करावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली.

धर्मांतराचा प्रयत्न वारंवार घडत आहे. गरीब व्यक्तींना आणि कुटुंबीयांवर दडपशाही केली जात आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारीही करण्यात आल्या आहेत. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा तातडीने हा धर्मांतरचा कट थांबवावा, अशी मागणी करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले.

या मोर्चामध्ये ‘जितो’, कर्नाटका जैन असोसिएशन, दक्षिण भारत जैन सभा, माणिकबाग दिगंबर जैन बोर्डिंग, भारतीय जैन संघटना, जैन युवा वेदिके, आराधना महिला मंडळ, धारिणी महिला मंडळ, मजगाव, पिरनवाडी, अनगोळ, मच्छे, धामणे, हलगा, बस्तवाड, अलारवाड, बैलहोंगल, कित्तूर, खानापूर आदींसह बेळगाव शहरातील जैन मंदिरांचे ट्रस्टी व पदाधिकारी उपस्थित होते.

गृहमंत्र्यांनी घेतली दखल

राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी याची तातडीने दखल घेतली असून पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीसप्रमुखांना तातडीने पत्रे पाठविली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने अहवाल गृह विभागाकडे पाठवावा, असे या पत्रात म्हटले आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. तेव्हा तातडीने याची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, असेही पत्रामध्ये म्हटले आहे.

Related Stories

यंदा नववर्षाच्या स्वागतावरही कोरोनाची छाया

Patil_p

केएलई डॉ.शेषगिरी कॉलेजमध्ये निवासी शिबिर

Amit Kulkarni

अपघातात टिळकवाडी येथील महिला ठार

Amit Kulkarni

निपाणीत शुकशुकाट, फक्त पाखरांचा किलबिलाट…!

tarunbharat

विद्या आधारद्वारे विद्यार्थिनीला मदत

Patil_p

नेत्रा जोशी यांच्या गायनाची आज मैफल

Omkar B
error: Content is protected !!