तरुण भारत

‘बगीचा रेस्टॉरंट’तर्फे आजपासून ‘ओरिएंटल फूड फेस्टिव्हल’

प्रतिनिधी /बेळगाव

गणेशपूर बेळगावस्थित ‘बगीचा मल्टिकुसीन रेस्टॉरंट’तर्फे ‘ओरिएंटल फूड फेस्टिव्हल’चे शुक्रवार दि. 22 ते रविवार 31 ऑक्टोबरपर्यंत दुपारी 12 ते 3-15 व सायंकाळी 7 ते 10-15 पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये दक्षिणपूर्व आशियाई पदार्थांचा समावेश आहे.

Advertisements

व्हेज व नॉनव्हेज, चायनिज, हाँगकाँग, थाई व फिलीपिन्सच्या विविध पदार्थांची रेलचेल या फूड फेस्टिव्हलमध्ये असणार आहे. बगीचा रेस्टॉरंट हे समस्त बेळगावकरांचे सहकुटुंब सहपरिवार भोजन करण्याचे आवडते ठिकाण आहे. भव्य पटांगण व आल्हाददायक वातावरण यामुळे हे हॉटेल तरुणाईचे खास आकर्षण आहे. दररोज नियमित वेळेत या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून बेळगावकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Stories

चिकोडी, निपाणी परिसरात दिवाळी उत्साहात

Patil_p

इनरव्हीलतर्फे अवयवदान विषयावर स्पर्धा

Patil_p

नदाफ-पिंजार समाजासाठी निगमची स्थापना करा

Patil_p

वैभवनगर बसथांबा बनला अवैध धंद्याचा अड्डा

Omkar B

लॉकडाऊन.. विळखा अधिकच घट्ट

tarunbharat

एमएलआयआरसीमधून प्रशिक्षणार्थी जवान बेपत्ता

Rohan_P
error: Content is protected !!