तरुण भारत

रोटरी परिवार बेळगावतर्फे मोफत अवयव रोपण शिबिर

प्रतिनिधी /बेळगाव

रोटरी परिवार बेळगावतर्फे दि. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 ते दुपारी  1 या वेळेत अयोध्यानगर, विजया आर्थो ऍण्ड ट्रामा सेंटर येथे मोफत ‘आर्टीफिशियल लिंब’ (कृत्रिम अवयव) शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिराला पुणे येथील ‘साधू वासवानी ट्रस्ट’ व रोटरी क्लब इचलकरंजी टेक्स्टाईल यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती रोटरीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Advertisements

गुरुवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषेदत रोटरी क्लब साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक म्हणाले, पहिल्या वषी साधू वासवानी ट्रस्टच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. त्यावेळी लाभार्थीच्या चेहऱयावरील आनंद पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली. त्यामुळे  हे शिबिर सातत्याने घेण्याचे आम्ही ठरविले.

या शिबिराला बेळगावमधील रोटरीचे सर्व क्लब, इनरव्हील क्लब, जिल्हा अपंग कल्याण कार्यालय, रेडक्रॉस सोसायटी व फिजिकली हॅण्डीकॅप्ड संस्थेचे सहकार्य लाभले आहे. सदर शिबिर डॉ. रवि पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओथेरेपी बेळगाव व राजस्थानी युवक सेवा मंडळ, शहापूर यांनी पुरस्कृत केले आहे. रोटरी परिवारांनी काही दिव्यांगांशी संपर्क साधला आहे. तर त्या दिवशीसुद्धा या शिबिराचा लाभ संबंधित दिव्यांगांना घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. दि. 24 रोजी लाभार्थींचे माप घेतले जाईल. त्यानंतर काही आठवडय़ात त्यांना पुन्हा बोलाविण्यात येईल. शिबिराला कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र व गोवा येथून 500 हून अधिक लाभार्थी येतील, अशी अपेक्षा रोटरी क्लब वेणुग्रामचे चंद्रकांत राजमाने यांनी व्यक्त केले. साधू वासवानी ट्रस्टतर्फे ‘आर्टीफिशियल लिंब’ पूर्णतः मोफत देण्यात येतील. तर सर्व लाभार्थींच्या सोयीसाठी भोजनाची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी मिडटाऊनचे अशोक मळगळी यांनी दिली. या पत्रकार परिषदेला रोटरी वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी, सचिव विनय बाळेकाई उपस्थित होते.

Related Stories

कोविड समितीच्या मंजुरीनंतर ऑक्सिजन प्लांटची उभारणी

Amit Kulkarni

सहआयुक्त आकाश चौगुले यांचे दहावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Amit Kulkarni

खासबाग येथे चेंबर ठरतोय धोकादायक

Amit Kulkarni

भाजीपाला बहरात… बाजारपेठा कोमात

Omkar B

ऑनलाईन पासपोर्ट काढणे झाले सोपे

Patil_p

सिद्धरामय्यांकडून बेंगळूर हिंसाचाराचा निषेध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!