तरुण भारत

स्वदेशी वस्तूंचा वापर करा

के. जगदीश यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे परदेशी बनावट वस्तू देशात मोठय़ा प्रमाणात विकल्या जातात. त्यामुळे दरवषी कोटय़वधी रुपये परदेशात जात आहेत. यासाठी स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार करणे आवश्यक आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर वाढल्यास देशाच्या उत्पन्नाबरोबर रोजगारातही वाढ होईल, असे मत स्वदेशी जागरण मंचाचे कर्नाटक व तेलंगणा संपर्क प्रमुख के. जगदीश यांनी व्यक्त केले.

स्वदेशी जागरण मंचातर्फे गुरुवारी आरपीडी व जीएसएस महाविद्यालयाच्या एसकेई सोसायटीच्या सभागृहात चर्चा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, अध्यक्ष सेवंतीलाल शहा, लघुउद्योग भारती कर्नाटक शाखेच्या राज्य सचिव प्रिया पुराणिक, एसकेईच्या सदस्या बिंबा नाडकर्णी, लता कित्तूर, आरपीडी कॉलेजच्या प्राचार्या शोभा नाईक, जीएसएस पीयु कॉलेजचे प्राचार्य प्रणव पित्रे, उपस्थित होते.

के. जगदीश पुढे म्हणाले, देशात दरवषी लाखो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. मात्र त्या मानाने रोजगार उपलब्ध नसल्याने बेरोजगारी निर्माण होत आहे. देशात एखादे पद भरायचे असल्यास हजारो अर्ज दाखल होतात. यावरूनच देशातील बेरोजगारीची परिस्थिती समजते. यासाठी शाळा स्तरावरच सर्व विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

आपल्या देशातच अधिक प्रमाणात पिकाऊ जमीन आहे. मात्र याच जमिनीत रासायनिक खताचा वापर वाढला आहे. त्यामुळे जमीन दिवसेंदिवस नापिक बनत चालली आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतकरी अडचणीत येत असून शेतकऱयांनी सेंद्रीय खताचा वापर करून शेती फुलविली पाहिजेत. वाढत्या रासायनिक खतामुळे लाखो एकर जमीन नापिक बनत असून खर्च देखील वाढला आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीबरोबर उत्तम आरोग्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर करावा, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

यावेळी किरण ठाकुर म्हणाले, बेरोजगारी कमी करण्यासाठी शाळा स्तरावरच कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले पाहिजेत. त्याबरोबरच शाळांतून शिक्षणाबरोबर सुतार, गवंडी व इतर व्यवसायाविषयी प्रशिक्षण देवून विद्यार्थ्यांना घडविले पाहिजेत. इतर देशांच्या तुलनेत उत्पादन वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी टेनिंग कॉलेज आवश्यक असून त्यादृष्टीने विचार सुरु असल्याचे सांगितले.

विद्यार्थिनी पूर्वी भादमुरले हिने स्वागतगीत सादर केले. यावेळी के. जगदीश व प्रिया पुराणिक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्या शोभा नाईक यांनी स्वागत करून आभार मानले. याप्रसंगी दोन्ही महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

शहरातील 12 हजार घरांमध्ये गॅसपुरवठा

Patil_p

मंदिरांवरील प्रशासक नियुक्तींमुळे ट्रस्टीचे अस्तित्व धोक्मयात

Amit Kulkarni

सर्व साहित्य प्रकारांचा अभ्यास करणे आवश्यक

Amit Kulkarni

श्री गणेश शरीरसौष्टव स्पर्धा 12 मार्च रोजी

Amit Kulkarni

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे विलक्षण व्यक्तिमत्त्व

Patil_p

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे तिथीनुसार शिवपुण्यतिथी गांभीर्याने

Amit Kulkarni
error: Content is protected !!