तरुण भारत

विकास केल्याचा मावळत्या बुडा अध्यक्षांचा दावा

प्रतिनिधी /बेळगाव

बुडाच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर विविध विकासकामे राबविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. 2007 पासून रखडलेली योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला असून कणबर्गी योजना क्रमांक 61 करिता भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तरीदेखील काहींच्या विरोधामुळे अध्यक्षपदावरून कमी करण्यात आल्याने घुळाप्पा होसमनी यांनी खंत व्यक्त केली.

Advertisements

बुडाचे मावळते अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित करून नाराजी व्यक्त केली. केवळ बी. एस. येडियुराप्पा यांचे समर्थक असल्याने अध्यक्षपदावरून हटविल्याचा आरोप त्यांनी केला. दीड वर्षाच्या कालावधीत अध्यक्ष म्हणून काम करताना कणबर्गी योजना मार्गी लावण्यासाठी अधिक प्राधान्य दिले आहे. योजनेसाठी भूसंपादन करण्यासह जागा ताब्यात घेऊन राज्य शासनाकडून आराखडा मंजूर करून घेतला आहे. तसेच योजनेंतर्गत गरिबांना घरे देण्याच्यादृष्टीने अर्ज मागवून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. बहुमजली व्यापारी संकुलाची उभारणी, अत्याधुनिक पद्धतीने समुदाय भवन, हॉकी स्टेडियम अशी विविध विकासकामे शहरात राबविण्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. शहराच्या विकासासाठी आणि योजना क्रमांक 61 राबविण्यासाठी प्रयत्नशील असताना काहींनी नाराजी व्यक्त करून पदावरून हटविण्यासाठी प्रयत्न केल्याची टीका केली.

माझ्यावर अन्याय…

पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्य केले असूनही माझ्या पक्षातील वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन बैठका आयोजित केल्या होत्या. पण विकासकामे राबविण्यासाठी प्रयत्न करूनही माझ्यावर अन्याय करण्यात आला आहे. पण पक्षाच्या धोरणाविरोधात जाणार नाही. मात्र विकासकामे राबविण्यासाठी आणि शहराचा विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे घुळाप्पा होसमनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Related Stories

येडूर येथे रांगोळी स्पर्धा उत्साहात

Patil_p

देशातील 70 टक्के जमीन नापीक होईल

Amit Kulkarni

बेळगाव जिह्यात सोमवारी 38 जणांना कोरोनाची बाधा

Rohan_P

पहिल्या रेल्वेगेट येथील बॅरिकेड्स हटविणार कधी?

Omkar B

सोमवारी कोरोनाचे बारा नवे रुग्ण

Patil_p

हिंडलगा-मण्णूर मार्गावर धोकादायक एकेरी वाहतूक

Amit Kulkarni
error: Content is protected !!