तरुण भारत

पहिली भूमिगत कचराकुंडी एसपीएम रोडशेजारी

डिजिटल लायब्ररीशेजारी काम सुरू : एका कुंडीसाठी 3 लाख रुपये खर्च येणार

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असल्याने शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महानगरपालिकेने अत्याधुनिक पद्धतीच्या भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पहिली भूमिगत कचराकुंडी एसपीएम रोडवरील डिजिटल लायब्ररीशेजारी बसविण्यात येणार असून सदर काम सुरू करण्यात आले आहे.

शहरात रस्त्याशेजारी किंवा इतरत्र कचरा पसरत असल्याने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर एक डस्टबिन आणि कॉम्पॅक्टर घेण्यात येणार आहे. स्मार्ट कचराकुंडय़ा फुटपाथ किंवा खुल्या जागेच्या ठिकाणी ठेवता येणे शक्मय आहे. भूमिगत बसविण्यात येणाऱया एका कुंडीसाठी 3 लाख रुपये खर्च येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर एसपीएम रोडवरील डिजिटल लायब्ररी शेजारील जागेत शहरातील पहिली भूमिगत कचराकुंडी बसविण्याचा प्रस्ताव आहे.  एक कचराकुंडी आणि कॉम्पॅक्टरकरिता निविदा काढण्यात आली होती. कचराकुंडी बसविण्यासाठी टाकी बांधण्यात आली असून लवकरच कचराकुंडी बसवून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांनी दिली. तसेच आता आणखी 15 अत्याधुनिक भूमिगत कचराकुंडय़ा खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. याकरिता 41 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यक ठिकाणी भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्यात येणार आहेत.

भूमिगत कचराकुंडय़ांमुळे दुर्गंधी रोखता येणार

फुटपाथच्या ठिकाणी जमिनीच्या खाली टाकी बांधून त्यामध्ये कचराकुंडय़ा ठेवण्यात येणार आहेत. त्यावर झाकण येणार असून, केवळ कचरा टाकण्यासाठी लहान आकाराची पेटी असणार आहे. कचराकुंडी खुली असल्याने घाण व दुर्गंधी पसरलेली असते. यावर उपाययोजना म्हणून या नव्या कुंडय़ा बसविण्याचा विचार चालविला आहे. या कचराकुंडय़ामुळे दुर्गंधीदेखील पसरत नाही. कचराकुंडी भूमिगत असल्याने भटकी जनावरे किंवा कुत्र्यांचादेखील उपद्रव थांबणार आहे.

Related Stories

विसर्जनाकरिता मनपाची फिरती वाहन सुविधा

Amit Kulkarni

कर्नाटक: माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला कोरोना

Abhijeet Shinde

चिकालगुड्ड येथे ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन

Amit Kulkarni

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

Amit Kulkarni

ईद-ए-मिलाद सण साध्यापध्दतीने साजरा करा

Rohan_P

पदवीपूर्व शिक्षक मूल्यमापनावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!