तरुण भारत

मनपा कार्यालयात जन्म-मृत्यू दाखले देण्याचे बंद

सेवासिंधू केंद्रांवरही दाखले मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

जन्म व मृत्यू दाखले सेवासिंधू केंद्राद्वारे वितरित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका कार्यालयात जन्म-मृत्यू दाखले देण्याचे बंद करण्यात आले आहे. मात्र सेवासिंधू केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगून दाखले देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी 50 रुपये आकारण्यात येत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

नागरिकांना तातडीने जन्म-मृत्यू दाखले उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने शहरात असलेल्या सेवासिंधू केंद्रांद्वारे ऑनलाईन जन्म-मृत्यू दाखले देण्याची सुविधा ई-जन्मच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. शहरात 60 हून अधिक सेवासिंधू केंदे असून यापैकी 30 केंद्रांची यादी महापालिका कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच मनपा कार्यालयात दाखल्यांसाठी गर्दी होत असल्याने सेवासिंधू केंद्रांवर दाखले घेण्याची सूचना करण्यात येत आहे. मनपा कार्यालयात गेलेल्या नागरिकांना ऑनलाईन केंद्रांची माहिती देऊन दाखले देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे गोंधळ उडाला असून नागरिकांना जन्म-मृत्यू दाखला घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

सेवासिंधू केंद्रांवरदेखील दाखले देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या सेवासिंधू केंद्रांवर नागरिक गेले असता दाखले मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मनपाने प्रसिद्ध केलेल्या सेवासिंधू केंद्राच्या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधला असता मोबाईल अस्तित्वात नसल्याचा मेसेज येत आहे. तर काही मोबाईल स्वीच ऑफ आहेत. काही केंद्रांवर एका दाखल्यासाठी 50 रुपये घेण्यात येत असल्याची तक्रार नागरिकांनी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्याकडे गुरुवारी केली. तसेच ऑनलाईन केंद्रांवर दाखले मिळत नसल्याचे सांगून मनपा कार्यालयातच दाखले वितरित करण्यात यावेत, अशी मागणी केली.

मनपा कार्यालयात दाखले देण्यास प्रारंभ

सदर ऑनलाईन सुविधा नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आली असून याचा लाभ घ्यावा, असे मनपाकडून सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात गैरसोयच अधिक झाली असून सेवासिंधू केंद्रांवर दाखले मिळत नसल्याने नागरिक मनपा कार्यालयात धाव घेत आहेत. सेवासिंधू केंद्रांबरोबर मनपा कार्यालयातही दाखले देण्याची सुविधा सुरू ठेवावी, अशी मागणी आरोग्य अधिकाऱयांकडे करण्यात आली. त्यामुळे मनपा कार्यालयात दाखले देण्यास प्रारंभ करण्यात आला.

Related Stories

दिवंगत अभिनेते अंबरीश यांच्या स्मारकासाठी कर्नाटक सरकारकडून ५ कोटी

Abhijeet Shinde

मतमोजणी प्रवेशावेळी कोरोना निगेटिव्ह अहवाल बंधनकारक

Amit Kulkarni

सोमवारी 1097 कोरोनामुक्त 8 जण दगावले; 389 नवे रुग्ण

Amit Kulkarni

कर्नाटक: ५६१९ पॉझिटिव्ह तर २४ तासांत ५४०७ रुग्ण बरे, १०० रूग्णांचा मृत्यू

Abhijeet Shinde

‘नागरिकत्व’ विरोधात रायबाग बंद कडकडीत

Patil_p

सलग दुसऱ्या दिवशी अवैध दारूसाठा जप्त

Rohan_P
error: Content is protected !!