तरुण भारत

अपघातात टिळकवाडी येथील महिला ठार

कोल्हापूर सर्कलजवळ दुभाजकाला दुचाकी आदळल्याने घडली दुर्घटना, मुलगी जखमी

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

दुभाजकाला दुचाकी आदळून कोल्हापूर सर्कलजवळ बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात आगरकर रोड, टिळकवाडी येथील एका महिलेचा मृत्यू झाला तर तिची मुलगी जखमी झाली. होंडा ऍक्टीव्हावरून घरी जाताना ही घटना घडली आहे. अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पूजा महेश गावडे (वय 46, रा. आगरकर रोड, टिळकवाडी) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तिची मुलगी तन्वी (वय 16) ही जखमी असून तिला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा व तन्वी या दोघी मायलेक एका कार्यक्रमानिमित्त केए 22 ईव्ही 7350 क्रमांकाच्या होंडा ऍक्टीव्हावरून कोल्हापूरला गेल्या होत्या.

कोल्हापूर येथील कार्यक्रम आटोपून रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास या दोघी दुचाकीवरून बेळगावला निघाल्या. मध्यरात्री 2.20 वाजण्याच्या सुमारास त्या कोल्हापूर सर्कलजवळ पोहोचल्या. दुभाजकाला दुचाकी आदळून मायलेक खाली पडल्या. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पूजा यांना सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पूजा यांच्या पश्चात दोन मुली, जावई असा परिवार आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

नेहरुनगर येथील केपीटीसीएल कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद

Amit Kulkarni

पालकमंत्र्यांच्या आजच्या बैठकीत बिम्सचा इलाज होणार का?

Patil_p

बेंगळूरमध्ये बिहारी कामगारामुळे 9 जणांना संसर्ग

Rohan_P

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार

Patil_p

ग्रा. पं. निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार

Omkar B

पुन्हा पावसाच्या हजेरीने हवेत गारवा

Patil_p
error: Content is protected !!