तरुण भारत

कणबर्गी येथे सराफी दुकानात चोरी

साडेतीन लाखांचे दागिने पळविले : माळमारुती पोलिसात एफआयआर

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कणबर्गी येथील एका सराफी दुकानात चोरीची घटना घडली आहे. चोरटय़ांनी शटर उचकटून सुमारे साडेतीन लाख रुपयेहून अधिक दागिने चोरटय़ांनी लांबविले आहेत. गुरुवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

बस थांब्याजवळील पवन ज्वेलरी वर्क्स या सराफी दुकानाचे शटर उचकटून चोरटय़ांनी दागिने पळविले आहेत. यासंबंधी जयवंत प्रभाकर रायकर (रा. वडगाव) यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

जयवंत हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. या दुकानाला दोन शटर आहेत. बाजूचे लहान शटर उचकटून चोरटय़ांनी दुकानात प्रवेश करून चार नेक्लेस, एक हार, एक बोरमाळ, दहा अंगठय़ा असे सुमारे 108 ग्रॅम सोन्याचे दागिने व 15 हजार रुपये रोख रक्कम चोरटय़ांनी पळविली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. सराफी दुकानातील चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

रात्रीची गस्त सुरू आहे का? बेळगाव शहर व उपनगरांमध्ये गेल्या एक-दीड महिन्यांपासून चोऱया, घरफोडय़ांचे सत्र सुरू आहे. रोज एक किंवा दोन चोरीचे प्रकार घडत आहेत. पूर्वीपासूनच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस व अधिकारी रात्रीची गस्त घालतात. आळीपाळीने गस्त घालण्याची व्यवस्था असते. सध्या गस्त व्यवस्थितपणे सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ कर्मचारी फिरत असतात. अधिकारी व्यवस्थितपणे गस्त घालत नाहीत, अशी ओरड आहे. त्यामुळेच गुन्हेगारीत वाढ होत चालली असून अधिकारी गुन्हे रोखण्याऐवजी पत्रकारांना अशा घटनांची माहिती मिळू नये, याची व्यवस्था करण्यात धन्यता मानत आहेत.

Related Stories

नामफलक प्रकरणी महापालिकेची पळवाट

Amit Kulkarni

रात्रंदिवस सेवा बजावणाऱया पोलिसांना अल्पोपहार

tarunbharat

मुरलीधर योग गुरुकुल सरस्वती वाचनालय विद्यार्थ्यांचे यश

Amit Kulkarni

बारावी परीक्षेसाठी पूर्वतयारीची गरज

tarunbharat

अखेती ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

Omkar B

केएलई आयुर्वेदिक कॉलेजमध्ये व्हाईट कोट डे कार्यक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!