तरुण भारत

म्हापशात अभिषेक बुक सेंटरचे भव्य ग्रंथ प्रदर्शन

प्रतिनिधी /फोंडा

अभिषेक बुक सेंटर, मुंबईचे भव्य पुस्तक विक्री प्रदर्शन म्हापसा शहरातील श्री हनुमान नाटय़गृहात भरविण्यात आले आहे. इंग्रजी व मराठीतील नामंवत लेखकांची विविध विषयांवरील हजारो पुस्तके सवलतीच्या दरात याठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. पुढील काही दिवस सकाळी 10 ते रात्री 9 वा. यावेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील नामवंत लेखकांच्या कथा, कादंबऱयांसह निरनिराळय़ा विषयांवरील वैविद्यपूर्ण पुस्तके या प्रदर्शनात 15 ते 50 टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक, माहितीपर, व्यवस्थापन यासह अन्य विषयावरील पुस्तकांचा त्यात समावेश आहे. वाचकांची निरंतर मागणी असलेल्या नामवंत लेखकांच्या पुस्तकांबरोबरच गेल्या दोन वर्षांमध्ये नव्याने प्रकाशित झालेली अनेक पुस्तकेही या प्रदर्शनात वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. इंग्रजी साहित्यातील जुन्या व नवीन पुस्तकांचा मोठा संग्रह हे या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ आहे. इंग्रजीतील अनेक नामवंत लेखकांच्या सदाकाळ वाचल्या जाणाऱया कथा कादंबऱया व इतर माहितीपर पुस्तके सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. याशिवाय विज्ञान व अन्य विषयावरील इंग्रजी पुस्तके किलोच्या दरात याठिकाणी मिळत आहेत. बालसाहित्य व विविध शाखांमध्ये अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी पुस्तकेही उपलब्ध आहेत.

Advertisements

Related Stories

वर्षभरात 2103 अपघातांत 198 जणांचा मृत्यू

Patil_p

मनुष्याने धर्माचरणी जीवन जगणे हाच ब्रह्मानंद स्वामींचा उपदेश : सद्गुरु ब्रह्मशानंदाचार्य

Amit Kulkarni

विधानसभा अधिवेशन दोन दिवसांपुरते मर्यादित करा

Amit Kulkarni

फसवणूक प्रकरणी कोर्टाचा उद्या निवाडा शक्य

Omkar B

‘म्हादई’च्या बचावासाठी सांस्कृतिक संस्थांनी पुढे यावे

Patil_p

राज्याची आर्थिक स्थिती बिकट

Omkar B
error: Content is protected !!