तरुण भारत

पेडणेत मगो नेते प्रवीण आर्लेकर यांचा प्रचाराचा शुभारंभ

प्रतिनिधी /पेडणे

पेडणेतून मगो नेते प्रवीण आर्लेकर यांनी गुरुवारी कोरगाव येथील श्री देव कमळेश्वर, श्री देवी भूमिका व देव द्वारपाल यांना श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

   विधानसभा निवडणुकीला अवघे चार महिने शिल्लक आहेत. त्यामुळे पेडणे मतदारासंघातून मगो पक्षाच्या वतीने प्रवीण आर्लेकर यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. मगोचे चिन्ह असलेले शेले गळय़ात घालून तसेच टोप्या घालून उपस्थित मगो कार्यकर्त्यांनी प्रवीण आर्लेकर तुम आगे बढे हम तुमारे साथ है अशा घोषणा दिल्या.

  यावेळी प्रवीण आर्लेकर यांच्या सोबत त्यांची पत्नी पल्लवी, माजी आमदार परशुराम कोटकर, मगो कार्यकारिणी सदस्य सुदीप कोरगावकर, माजी खजिनदार आपा तेली, प्रवक्ते उमेश तळवणेकर, उगवे-तांबोसे-मोप पंचायतीच्या सरपंच सरस्वती नाईक, उपसरपंच सुबोध महाले, पंच मधुसुदन सामंत, पंच दीपक तांबोस्कर, पंच आश्विनी परब, पंच सुवर्णा केणी, माजी धारगळ जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, माजी पंच आवेलिनो रॉड्रिग्स, वजरीच्या माजी सरपंच व विद्यमान पंच संगीता गावकर, इब्रामपूरचे माजी सरपंच अशोक धावस्कर,   देवानंद गावडे, महेश परब, देविदास नागवेकर, आनंद तळवणेकर, संतोष नागवेकर, जयेश पालयेकर आदींसह इतर कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी मगोतर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

संधी दिल्यास किमान पेडणेकरांना 12 तास पाणी देणार!

पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या सारखी आपण खोटी आश्वासने देऊन पेडणेकरांची दिशाभूल करणार नाही. तो आता नोकऱया देणार म्हणून खोटी आश्वासने पेडणेकरांना देणारे गेली अनेक वर्षे ते नोकऱया देऊ शकले नाही. आता विमानताळ प्रकल्पावर नोकऱया देणार असे तो सांगता मात्र त्यासाठी आवश्यक असलेले टेनिंग स्कूल अद्याप सुरू केले नाही. आपण आमदार म्हणून निवडून आल्यास पहिल्यांदा टेनिंग स्कूल सुरू करुन टेनिंग देणार आणि मग त्यांना नोकऱया देणार. पेडणे मतदारसंघात पाण्याची गंभीर समस्या असून तो प्रश्न आमदार तथा उपमुख्यमंञी बाबू आजगावकर सोडवू शकले नाहीत.आपण निवडून आल्यास किमान 12 तास पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन यावेळी प्रवीण आर्लेकर यांनी केले. बाबू आजगावकरांनी जी निवडणुकीवेळी आश्वासने दिली होती, ती पाळली नाही, असे मगोचे माजी आमदार परशुराम कोटकर म्हणाले. मगोचे प्रवक्ते उमेश तळवणेकर, माजी जि. पं. सदस्य तुकाराम हरमलकर, सुबोध महाले, देवानंद गावडे, सुदीप कोरगावकर, संगीता गावकर आदींनी पेडणेच्या विकासासाठी प्रवीण आर्लेकर यांना आमदार म्हणून निवडून देऊया, असे आवाहन केले.

Related Stories

…तर जुने गोवे वारसा स्थळ धोक्यात

Patil_p

साखळीतील राजकारण सरकारला येणाऱया निवडणुकीत भोवणार

Amit Kulkarni

मर्जीनुसार न वागणाऱया अधिकाऱयांचे खच्चिकरण

Amit Kulkarni

नाटय़कलाकार राजदीप नाईक यांच्या कारगाडीच्या काचा फोडल्या

Amit Kulkarni

गणेश बाप्पाच्या आगमनासाठी सत्तरी तालुका सज्ज

Patil_p

आयाराम-गयाराम संस्कृतीस मूठमाती देणार

Omkar B
error: Content is protected !!