तरुण भारत

‘पोटाचे विकार आणि उपचार’ उद्या पणजीत वैद्यकीय शिबीर

प्रतिनिधी /मडगाव

पोटाच्या विकाराने त्रस्त असलेल्या रूग्णांसाठी पणजीत उद्या शनिवार दि. 23 आणि रविवार दि. 24 रोजी एआयएस क्लिनिक, दुसरा मजला, करमली ग्लास टॉवर, टॅफीक सेल समोर, गीता बेकरी जवळ, पणजी येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात पोटाच्या विकाराचे तज्ञ डॉक्टर प्रदीप पाटील हे रूग्णांची तपासणी करणार आहेत.

Advertisements

पोटदुखीने त्रस्त असलेले रूग्ण तसेच पोटात गॅसचा त्रास जाणवणारे रूग्ण,  खाल्लेले अन्न नीट पचत नाही अशा रूग्णांवर या शिबीरात उपचार केले जाणार आहे. पोटाचे विविध विकार हे ‘इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम (IBS) या व्याधीने ग्रस्त असू शकता. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये मध्यम वयोगटातील लोकांना भेडसावणारा विकार म्हणजे आयबीएस. आयबीएस पचनसंस्थेअंतर्गत येणारा व्याधी आहे. हा प्रामुख्याने मोठय़ा आतडय़ाला होणारा विकार आहे.

IBS ची लक्षणे : पोटात दुखणे, मळमळणे, बद्धकोष्ठता, शौचास पातळ होणे, पोटात मुरडा येणे, मळमळल्यासारखे वाटणे, पोटात गॅस होणे. प्रमुख कारणे : अयोग्य आहार, अति तेलकट, मसालेदार पदार्थ सेवन, जेवणाच्या वेळेत असणारा अनियमितपणा, भूक लागलेली असताना आहार न घेणे, मानसिक चिंता, मद्यपान तसेच काही पोटाचे विकार जसे पोटात गॅस होणे, अल्सर इ. बरेच लोक हा विकार स्वतःचा आहार, मानसिक ताणतणाव, जीवनशैली यामध्ये बदल घडवून नियंत्रणात आणतात पण काहीजणांना मात्र वैद्यकिय सल्ला व योग्य औषधांची गरज असते.

शारीरिक परिक्षण, जीवनशैली व काही निदान चाचण्या केल्यास आपल्याला IBS आहे की नाही हे स्पष्ट होते. खास होमियोपॅथी औषधोपचार पद्धती व योग्य आहार नियोजन द्वारे प्रत्येक स्तरावरील IBS ची लक्षणे पूर्णपणे नियंत्रण करण्यात मदत करते. या शिबीराच्या अधिक माहितीसाठी (8087828287) वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

लोकमान्य संस्थेच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

गांजा लागवडीचा प्रस्ताव पुढे नेणार नाही

Amit Kulkarni

एटीएममध्ये रक्कम भरणाऱया वाहनास आग

Patil_p

शिरीष देसाई यांचा सावर्डेतील उमेदवारीवर दावा

Amit Kulkarni

हडफडे सरपंचपदी राजेश मोरजकर बिनविरोध

Omkar B

तब्बल 70 नवे रुग्ण, एकूण 717

Patil_p
error: Content is protected !!