तरुण भारत

राखी प्रभुदेसाई यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रतिनिधी /पणजी

सांगे येथील कार्यकर्ती राखी प्रभुदेसाई यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर व इतर पक्ष पदाधिकाऱयांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राखी यांच्या प्रवेशामुळे युवक काँग्रेसच्या कार्याला चांगली धार बळकटी येईल असा दावा श्री. कामत व श्री. चोडणकर यांनी केला आहे.

Advertisements

पणजीतील काँग्रेस भवनात हा प्रवेश कार्यक्रम झाला. आपल्यासमोर अनेक पक्षांचे पर्याय होते परंतु सध्या फक्त काँग्रेस पक्षच जनतेचे प्रश्न घेवून लढत असून इतर पक्षात तो आवाज कुठेच दिसत नाही म्हणून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे श्रीमती प्रभुदेसाई यांनी सांगितले. भाजप हा सर्वसामान्य लोकांसाठी काम करीत नाही. महिलांसाठी तर या पक्षाने काहीच केलेले नाही. या उलट काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांवर लढतो आहे. महिलांचे व जनतेचे प्रश्न घेवून आपणही काँग्रेसच्या साथीने लढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

राखी या लढवय्या महिला कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असून त्यांनी यापुर्वी अनेक  प्रश्नावर आवाज उठवला आहे. त्यांच्या समावेशाने युवक काँग्रेसचा आवाज आणखी बुलंद होईल असे श्री. कामत म्हणाले. आंदोलन कर्त्या काँग्रेस कार्यकर्त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा त्यांच्यासह श्री. चोडणकर यांनी निषेध नोंदवला.  लाठीहल्ल्याचा आदेश कोणीच दिला नव्हता तरी देखील तो झाला याबाबत त्यांनी आश्चर्य प्रकट केले आणि त्यात 52 जण जखमी झाल्याचा दावा केला.

जनतेच्या प्रश्नावर लढणाऱयांचा आवाज दाबून टाकणे हेच या सरकारचे काम असून विधानसभेतही महत्त्वाच्या प्रश्नावर सरकारने उत्तरेच दिली नाहीत म्हणून या सावंत सरकारच्या विरोधात जनतेत राग, असंतोष धुमसत असून जनता आगामी विधानसभा निवडणुकीत या सरकारला घरी बसवेल असे ते म्हणाले.

Related Stories

गोमेकॉच्या गेट बाहेरील विक्रेत्यांना हटविले

Amit Kulkarni

सार्वजनिक गणेशोत्सव यंदा मर्यादित स्वरुपात

Omkar B

गोकुळवाडी सखळीत आढळले जिवंत नवजात बालक

Amit Kulkarni

वाहतूक बेटावरून मडगाव नगराध्यक्ष, मुख्याधिकारी धारेवर

Amit Kulkarni

सांगे, केपे, काणकोण, धारबांदोडाच्या कृषी विकासावर भर देणार

Patil_p

मासेमारीसाठी गेल्यावेळी बेपत्ता झालेल्या युवकाचा थांगपत्ता नाही

Patil_p
error: Content is protected !!