तरुण भारत

विकासाबद्दल बोलणारा आप हा एकमेव पक्ष

ऍड. अमित पालेकर यांचे प्रतिपादन : आपमध्ये केला प्रवेश

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

मेरशी आणि सांताक्रूझ परिसरात सामाजिक कार्यासाठी परिचित असलेले प्रसिद्ध वकील अमित पालेकर यांनी गुरुवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी बोलताना, आरोग्य सेवा, शिक्षण, नोकरी तसेच विकासाच्या बाबतीत ठोस कृती योजना राबविणारा आप हा एकमेव पक्ष असल्याचे ते म्हणाले.

पक्षप्रवेश केल्यानंतर पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर ताळगाव मतदारसंघ प्रभारी सेसिल रॉड्रिगीश, उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक, प्रसिद्ध नाटय़कलाकार राजदीप नाईक, आदींची उपस्थिती होती.

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले ऍड. पालेकर यांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी असून त्यांच्या मातोश्री दहा वर्षे मेरशी गावच्या सरपंचपदी होत्या. कोविड काळात राज्याने ओढवून घेतलेल्या ऑक्सिजन तुटवडा संकटात त्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्याने सरकारची नाच्चकी झाली होती.

पुढे बोलताना ऍड. पालेकर यांनी अरविंद केजरीवाल यांची दूरदृष्टी, सचोटी आणि प्रत्यक्षात विकास घडवून आणण्याच्या इच्छेचे कौतुक केले. त्यांच्या याच कार्यामुळे आपण आपकडे आकर्षित झालो, असे ते म्हणाले. विद्यमान सरकारने सांताक्रूझमधील रहिवाशांना त्यांच्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले आहे. परिसरातील अनेक बेरोजगार, गरीब तरुणांवर लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जीएमसी परिसरातील विपेत्यांना हाकलून लावले आहे. त्याशिवाय सततचा खंडित वीज आणि पाणीपुरवठय़ामुळे गोमतकीयांचे नुकसान होत आहे आणि त्या समस्या सोडविण्यात सरकार रस घेत नाही. अशावेळी आप हाच एकमेव आशेचा किरण दिसत असल्याचे ते म्हणाले. सेसिल रॉड्रिग्स यांनी पालेकर यांचे पक्षात स्वागत केले. उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी पालेकर यांना शुभेच्छा देताना त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. राजदीप नाईक आणि अन्य मान्यवरांनीही यावेळी विचार मांडले.

Related Stories

वाळपई शहर प्लास्टिकमुक्त मोहीम परिणामकारक करणे गरजेचे

Omkar B

म्हापसा पालिकेवर सत्ता कुणाची जोशुआ डिसोझा की सुधीर कांदोळकर

Amit Kulkarni

महिलांवरील अत्याचारांबद्दल मुख्यमंत्री गप्प का ?

Patil_p

हाताने गणेश मूर्ती साकारणारा अवलिया कलकार ज्ञानेश्वर वाडजी

Omkar B

वेळसाव-सेसा अकादमी प्रो. फुटबॉल स्पर्धेतील लढत अनिर्णीत

Amit Kulkarni

खनिजमाल वाहतुकीला कोणत्या दबावाखाली परवानगी ?

Omkar B
error: Content is protected !!