तरुण भारत

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात

काँगेसची मडगावात निदर्शने

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. या दरवाढीमुळे सर्व सामान्य जनता हैराण झाली आहे. दर वाढ रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार काहीच पावले उचलत नसल्याच्या निषेधार्थ काल मडगावात दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने मडगावच्या मोहिद्दीन पेट्रोल पंपावर निदर्शने केली.

दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ज्यो डायस म्हणाले की, सरकारने लवकरात लवकर पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली. पेट्रोलवर केंद सरकार 35 रूपये तर डिझेलर व 32 रूपये कर आकारत आहे. गोवा सरकारचे व्हॅट कर साधारणपणे 24 रूपये आहे. त्यामुळे 35 रूपयांच्या पेट्रोलवर आम्हाला 100 रूपये मोजावे लागतात. आत्ता हा दर 104 रूपयांवर पोचला आहे.

केंद्र व राज्य सरकारने तातडीने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे, कारण पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली ही अन्य जीवनाश्यक वस्तूचे दर देखील वाढत असतात. या महागाईत जीवन जगणे लोकांना कठीण होऊन बसल्याचे ज्यो डायस यावेळी म्हणाले.

दीपक खरंगटे म्हणाले की, पेट्रोल व डिझेलचे दर वाढ असल्यानेच आम्हाला मोर्चा काढावा लागला. भाजप सरकार महागाई कमी करण्याची भाषा बोलते. पण, प्रत्यक्षात महागाई कमी होताना कुठेच आढळून येत नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणे म्हणजेच सर्व प्रकारची कडधान्यांचा दर वाढत असतो. महागाई आणखीन वाढू नये यासाठी आज काँगेस कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावे लागले.

भाजप सरकारने आर्ज सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जनता आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरली तर त्यांच्यावर पोलिसांकरवी लाठी चार्ज करण्यास सांगते. भाजपने सद्या हिटलर शाही चालविली आहे. धमकी देण्याचे सत्र देखील चालू ठेवले आहे. पोलीस जेव्हा लाठी चार्ज करतात, तेव्हा मामलेदार किंवा उपजिल्हाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक असते असे कायदय़ात नमूद केलेले आहे. मात्र, या ठिकाणी कायदा धाब्यावर बसविला आहे. बुधवारी पणजीत युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आलेला लाठी चार्ज सर्व गोमंतकीयांनी पाहिला आहे. त्यात भाजपच्या बद्दल तीव्र संतापाची लाट गोव्यात पसरली आहे.

Related Stories

छोटय़ा व्यावसायिकांना आता आर्थिक आधाराची गरज

Omkar B

वाहतूक बेटावरून मडगाव नगराध्यक्ष, मुख्याधिकारी धारेवर

Amit Kulkarni

गावागावात लोकांचे स्वेच्छेने लॉकडाऊन

Omkar B

कुर्टी येथे नवीन साकवाच्या कामाचा शुभारंभ

Amit Kulkarni

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे ध्येय

Amit Kulkarni

मुरगाव पोलिसांकडून चोरीचा छडा, चौघांना अटक

Omkar B
error: Content is protected !!