तरुण भारत

ट्रक -रुग्णवाहिका अपघातात रुग्ण ठार, दोघे जखमी

आधी हृदयविकाराचा झटका : अन् अपघाताने घातला काळाचा घाला.बांबोळी महामार्गावरील घटना

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

बांबोळी येथील महामार्गावर ट्रक व रुग्णवाहिका यांच्यात काल गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकटा ठार झाला असून दोघे जखमी झाले आहेत. रुग्णवाहिकेचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. ओल्ड गोवा पोलिसांनी  घटनेचा पंचनामा केला आहे. अपघातात जागीच ठार झालेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला गोमेकॉत नेण्यात येत होते. त्यामुळे आधी हृदयविकाराचा झटका आणि नंतर अपघाताने काळाचा घाला घातला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव प्रकाश नाईक (53) आहे. तर विकास तळेकर (35 बेतकी) व रवी नाईक (41 कुंभारजुवे) अशी जखमींची नावे आहेत. जखमी झालेल्या व्यक्तींना इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कुंभारजुवे येथील प्रकाश नाईक यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णवाहिकेतून त्यांना गोमेकॉत नेण्यात येत होते. त्यांच्या सोबत रवी नाईक व विकास तळेकर होते. मेरशी जंक्शन नंतर काही अंतर पुढे गेल्यावर समोरून मालवाहक ट्रक जात होता. रुग्णवाहिकेच्या चालकाचा ताबा सुटल्याने त्याने पुढे असलेल्या मालवाहक ट्रकाला जोरदार धडक दिली. रुग्णवाहिकेचा चक्काचूर झाला तर रुग्णवाहिकेत असलेला रुग्ण प्रकाश नाईक जागीच ठार झाला. ओल्ड गोवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

कोलमरड – मडगाव येथे रस्ता खचला

Amit Kulkarni

गोमंतक मराठा समाजाला निवडणुकपूर्वी ओबीसीचा दर्जा देण्यात यावा

Amit Kulkarni

गोवा भाजप माजी सैनिक विभाग संयोजकपदी अनंत जोशी

Amit Kulkarni

पंधरा लाखाच्या ड्रग्जसह नायजेरियनास अटक

Omkar B

गोवा अमलीपदार्थ मुक्त राज्य बनवावे

Amit Kulkarni

प्रख्यात वास्तुविशारद सार्तो आल्मेदा यांचे निधन

tarunbharat
error: Content is protected !!