तरुण भारत

म्हापशाचे नगरसेवक आरोलकर बंधुंची भाजपला सोडचिठ्ठी

आमदार टिकलोंच्या खोटय़ा आश्वासनांना कंटाळून राजीनामा : तारक आरोलकर

प्रतिनिधी /म्हापसा

Advertisements

म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक तारक आरोलकर व विकास आरोलकर या दोघा बंधुंनी भाजपला रामराम ठोकला. हळदोणाचे आमदार आम्हाला विश्वासात घेत नाहीत तसेच आमदारांचे समर्थक प्रॅकी कार्व्हालो आपल्या विरोधात नाहक बदनामी करतात, असा आरोप या आरोलकर बंधुनी पत्रकार परिषदेत केला आहे. हे दोन्ही आरोलकर बंधू म्हापसा विकास आघाडी पॅनलवर विजयी होऊन भाजपला पाठिंबा देत पालिका मंडळ स्थापन करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तारक आरोलकर म्हणाले की, आम्ही निवडून आल्यावर फक्त विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपला गेलो. यावर आम्ही आमच्या वॉर्डात विकासकामे करून गावातील नागरिकांना सहकार्य करणार असा विचार केला होता. मात्र विकास काही करता आला नाही. आपल्या वॉर्डातील काही आमदारांचे काही समर्थक आमचे पाय ओढण्याचे काम करीत आहेत. या आमदाराच्या निषेधार्थ आम्ही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

आमदार ग्लेन टिकलो अकार्यक्षम आमदार असून त्यांची जागा त्याना लोकांना दाखवून देण्याची वेळ आली आहे. गेली दहा वर्षे अशा अकार्यक्षम आमदारामुळे हळदोणा मतदारसंघ कायमस्वरुपी मागे राहिला आहे. आपली कामे होत नाहीत. याबाबत आपण प्रदेशाध्यक्ष तानावडे यांना व आमदार टिकलो यांना कळविले होते. मात्र आश्वासनाशिवाय त्यांच्याकडून आम्हाला काहीच मिळालेले नाही, असे तारक आरोलकर यांनी सांगितले.

पुढे कुठल्या पक्षात जावे याबाबत अद्याप विचार केलेला नाही. मात्र सर्वसामान्य गोरगरीबांना बरोबरीने घेऊन जाणार त्या पक्षाला आम्ही साथ देणार आहोत. आपल्याकडे काही पक्षांनी संपर्क साधलेला आहे. जनतेने आपला विचार केल्यास विधानसभा रिंगणात उतरण्याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. हळदोणा मतदारसंघात दोन वॉर्ड असले तरी काही भाग म्हापसा आमदारांच्या हद्दीत येतो. यावर बोलताना नगरसेवक विकास आरोलकर म्हणाले की, म्हापशातून आमदार जोशुआ डिसोझा यांच्याकडून आम्हाला सदैव प्रोत्साहन व सहकार्य मिळाले आहे. त्यांनी आमची 90 टक्के कामे पूर्ण केली. मात्र आमदार टिकलो यांची कधीच साथ मिळाली नाही. वॉर्डातील विकासकामे होत नसल्यानेच आम्हाला कठोर पाऊल उचलावे लागले.

Related Stories

फोंडा नगराध्यक्षपदी अपूर्व दळवी निश्चित

Patil_p

तब्बल 25 वर्षांनंतर शेतात पिकले सोने

Patil_p

डिचोलीत भाजपतर्फे रिंगणात उतरण्यास शिल्पा नाईक उत्सुक

Amit Kulkarni

ऊस उत्पादक शेतकऱयांचे हित सरकार जपणार – सावईकर

Patil_p

सभापती पाटणेकर यांचा निवडणूक लढविण्यास नकार

Amit Kulkarni

राजीनामानाटय़ावर पडदा पडेना

Patil_p
error: Content is protected !!