तरुण भारत

…सांगा दिवाळी कशी करायची?

महापालिका कर्मचांर्‍यांसमोर प्रश्न; बोनस नाही, तसलमातही वेळेवर मिळेना

विनोद सावंत / कोल्हापूर

बोनस नाही, हक्काची तसलमातही (अ‍ॅडव्हान्स) वेळेवर मिळेना झाली आहे. दिवाळी अगदी 15 दिवसांवर येऊनही दिवाळी खरेदीसाठी खिशात पैसेच नाहीत. मग ‘सांगा दिवाळी कशी करायची’ असा प्रश्न महापालिकेतील कर्मचार्‍यांच्यातून उपस्थित होत आहे. महापालिका कर्मचारी संघाने एक महिन्यापूर्वीच तसलमात (अ‍ॅडव्हान्स) मिळण्यासाठी प्रशासनाला पत्र दिले होते. या पत्राकडेही दुर्लक्ष केले आहे.

Advertisements

दिवाळी म्हटले की लहानांपासून मोठ्यांमध्ये एक उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असते. वर्षातील सर्वात मोठा सण असल्याने त्याची आतुरतेने वाट पाहिली जाते. नवीन कपडे, फराळ, फटाके, आकाशकंदील खरेदी केली जातात. यासाठी प्रत्येकाला बोनसची प्रतीक्षा असते. कोल्हापूर महापालिकेतील कर्मचारीही याला अपवाद नाहीत. मात्र, गेले काही वर्षापासून महापालिकेतील कर्मचार्‍यांना बोनस बंद झाला आहे.

कर्मचार्‍यांना ऐन सणावेळी आर्थिक समस्येला समोरे जावे लागू नये, यासाठी दिवाळीपूर्वी तसलमात (अ‍ॅडव्हान्स) देण्यात येते. महापालिका दहा महिन्यांत पगारातून ही रक्कम कपात करून घेते. दिवाळीपूर्वी बिनव्याजी रक्कम मिळत असल्याने ही तसलमात कर्मचार्‍यांना आधार ठरते. मुलांचे कपडे, दिवाळीचे साहित्य त्यातून खरेदी केले जाते. यामुळे कर्मचार्‍यांची या रकमेकडे आस लागून असते. यावर्षी मात्र, 15 दिवसांवर दिवाळी आली असताना याबाबत प्रशासनाने कोणताच निर्णय घेतलेला नाही. आस्थापन विभागाच्या हलगर्जीपणामुळे यंदा उशीर झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता आहे.

संघटनेचा संपाचा पवित्रा

महापालिका कर्मचारी संघटनेचे तसलमात (अ‍ॅडव्हान्स) मिळण्यासाठी प्रशासनाला 4 ऑक्टोबर रोजी रितसर पत्र दिले होते. यानंतर 13 ऑक्टोबर रोजीही पुन्हा स्मरणपत्र दिले. मात्र, याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. अद्यापही याबाबत निर्णय झालेला नाही. मंगळवारी (26) संघटना आणि प्रशासन यांची कर्मचार्‍यांच्या विविध विषयांसंदर्भात बैठक आहे. या बैठकीत तसलमातचा निर्णय झाला नाही तर संपावर जाण्याचा पवित्रा घेतला आहे.

निर्णय झाला नाही तर संप

शासनाच्या आदेशानुसार कायम कर्मचार्‍यांना 12 हजार 500, हंगामी कर्मचार्‍यांना 8 हजार आणि रोजंदारी कर्मचार्‍यांना 5 हजार रुपये तसलमात मिळण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मात्र, अद्यपही याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. प्रशासनाने तत्काळ निर्णय घेतला तर ठिक अन्यथा संपावर जावू.

– संजय भोसले, अध्यक्ष, महापालिका कर्मचारी संघ

तसलमातबाबत दोन दिवसांत निर्णय

गतवर्षीप्रमाणे यावेळीही कर्मचार्‍यांना तसलमात देण्याबाबतच्या प्रस्तावाची फाईल आस्थापना विभागाकडून संबंधित उपायुक्तांकडे गेली आहे. चार दिवसांत यावर निर्णय होऊन कर्मचार्‍यांना तसलमात वाटप केले जाईल.

– संजय सरनाईक, मुख्यलेखापाल, महापालिका
तसलमातच्या रक्कमेतही कपात

वास्तविक कायम कर्मचार्‍यांना 12 हजार 500 रूपये तसलमात देण्याचा शासन आदेश आहेत. मागील वेळी 8 हजार रूपयेच देण्यात आले होते. यावेळीही प्रशासनाने गतवर्षीप्रमाणे तसलमात देण्याचा शेरा प्रस्तावित फाईलवर मारला आहे. चार हजार रूपयांची कपात केल्याचे दिसून येत आहे.
  • एकूणू कर्मचारी – 3500
  • कायम कर्मचारी – 2900
  • हंगामी कर्मचारी – 600
  • एकूण तसलमातची रक्कम – 2 कोटी 25 लाख

Related Stories

गगनबावडा तालुक्यातील साळवण येथील मंडलअधिकारी कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

…तर शहरातील फेरीवाल्यांवर तीव्र कारवाई

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहर अतिक्रमणमुक्त करा – पालकमंत्री

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मायक्रोफायनान्सच्या फेऱ्यामध्ये महिला का अडकत आहेत? त्यावर उपाययोजनेसाठी अभ्यासगट नियुक्त करणार : मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

भाजपा कार्यकर्त्यांनी साताऱ्यात केला मंत्री नवाब मलिक यांचा निषेध

Sumit Tambekar

”देशात अच्छे दिन आणणारे येताना महागाई घेऊन आले”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!