तरुण भारत

मुख्यमंत्र्यांनी हाऊसिंग बोर्डची जागा परत करावी

काँग्रेस पक्षाची मागणी : साई नर्सिंग इन्स्टिटय़ूटसाठी जमीन लाटल्याचा आरोप,सांखळी पालिकेसाठी मुख्यमंत्र्यांचा रडीचा डाव

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या साई नर्सिंग इन्स्टिटय़ूटसाठी सांखळी येथील गोवा हाऊसिंग बोर्डाची सुमारे 2350 चौ. मी. जागा लाटली असून ती पुन्हा बोर्डाकडे परत करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. शिवाय सांखळी पालिकेवर भाजपची सत्ता यावी म्हणून डॉ. सावंत रडीचे डाव खेळत असून सांखळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांवर अपात्रता याचिका दाखल करुन त्यांना अपात्र करण्याचा डाव डॉ. सावंत यांनी आखला परंतु, न्यायालयाने ठपका ठेवून त्यांना रोखले आणि दिलासा दिला, अशी माहिती काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आली.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, धर्मेश सगलानी, प्रवीण ब्लॅगन यांनी सावंत यांच्या रडीच्या खेळांची माहिती दिली. ते म्हणाले की, सांखळीचे नगराध्यक्ष राया पार्सेकर, उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांना अपात्र करण्यासाठी नको ती कारणे लावण्यात आली. त्यांची सुनावणी खरे म्हणजे नगरपालिका प्रशासन संचालकांकडे व्हायला हवी होती. तिथे काही होत नाही म्हणून सुनावणी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक व वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्यासमोर सुनावणी ठेवली. पण तेथेही काही जमले नाही. यावरुन डॉ. सावंत हे कोणत्या थराला जातात हे दिसून आले. शेवटी न्यायालयानेच त्यांना रोखले, असे काँग्रेसने निदर्शनास आणले.

सगलानी यांनी सांगितले की, आम्ही कायदेशीरपणे पालिका चालवत आहोत. त्यावर न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केले आहे. पालिकेवर 7 प्रकरणे घालण्यात आली पण न्यायालयाने त्यातून पालिकेला मुक्त केले. सांखळी पालिकेचा कारभार न्यायालय चालवते, असे ते म्हणाले. ब्लॅगन यांनी हाऊसिंग बोर्डाची जमीन डॉ. सावंत यांनी कशी लाटली याची माहिती दिली.

Related Stories

घन कचरा व्यवस्थापनासाठी फोंडा शहरात अभिनव प्रयोग

Amit Kulkarni

… तरीही खाणी सुरु व्हायला हव्यात

Omkar B

‘सरकार तुमच्या दारी’च्या यशामुळे विरोधक अस्वस्थ

Patil_p

हडफडे-नागोवा सरपंचपदी श्रीकृष्ण नागवेकर

Amit Kulkarni

परप्रांतीय नागरिकांमुळे माड्डीतळप, पोळे चेकनाका परिसर गलिच्छ

Omkar B

आम्ही खेडेगावात राहिलो ही आमची चुक आहे ?

Patil_p
error: Content is protected !!