तरुण भारत

ममता बॅनर्जी 28 रोजी गोव्यात

प्रशांत किशोर गोव्यात ठाण मांडून : उत्तर गोव्यातील भाजप नेत्याच्या संपर्कात.ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत होणार नेत्यांचे प्रवेश

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या येत्या दि. 28 ऑक्टोबर रोजी तीन दिवसांच्या गोवा दौऱयावर येत असल्याचे एका वृत्तसंस्थेने कोलकत्यातून जाहीर केले. तथापि, येथील स्थानिक नेत्यांनी मात्र त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. दरम्यान, प्रशांत किशोर हे पुन्हा गोव्यात ठाण मांडून बसले असून उत्तर गोव्यातील भाजपच्या एका नेत्याच्या संपर्कात आहेत. ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत विजय सरदेसाई व त्यांचे दोन आमदार व भाजपच्या एका मोठय़ा नेत्याला पक्षात प्रवेश देण्याचे घाटत आहे. 

उत्तर गोव्यातील भाजपच्या एका नेत्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचे वृत्त सायंकाळी धडकले. प्रशांत किशोर हे सदर नेत्याला भेटण्यासाठी या महत्त्वाकांक्षी नेत्याकडे गेले होते. ममता बॅनर्जी यांच्यासमोर त्यांच्याहस्तेच पक्षाचा झेंडा स्वीकारावा असे त्यांना सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. भाजपच्या या नेत्याचे सध्या भाजपमध्ये चांगले चालत नसल्याचा फायदा तृणमूल काँग्रेसने उठविण्याचे ठरविले आहे. आयपॅकचे नेते प्रशांत किशोर हे आजही गोव्यात काही नेत्यांना भेटणार आहेत. गोवा विधानसभेचे अखेरचे अधिवेशनही झालेले असल्याने आता कोणीही पक्षातून बाहेर पडल्यास कोणताही फरक पडणार नाही. या धर्तीवर भाजपच्या नेत्यांनाही पक्षात आणण्यासाठी सदर पक्षातर्फे प्रयत्न चालू आहेत.

Related Stories

कोरोनाचे तांडव : तब्बल 30 जणांचा मृत्यू

Amit Kulkarni

विज्ञान, शैक्षणिक क्षेत्रात अधिक गुंतवणूक गरजेची : राज्यपाल सत्यपाल मलिक

Patil_p

आजही मुसळधार पाऊस

Amit Kulkarni

नाटय़परिषद, ठाणे शाखेच्या अभिनय स्पर्धेत गोव्याची शनया महाले विजेती

Amit Kulkarni

म्हादईविषयी ऑगस्टमध्ये वैयक्तिक सुनावणी

Omkar B

जीसीएने मुलींच्या क्रिकेटला प्रोमोट करावं: नगराध्यक्ष रायन ब्रागांझा

tarunbharat
error: Content is protected !!