तरुण भारत

योगींच्या कार्यक्रमात रिव्हॉल्व्हर घेऊन पोहचला व्यक्ती…

ऑनलाईन टीम / लखनऊ :

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बस्ती जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाही एक परवानाधारक रिव्हॉल्व्हर असलेला व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या अगोदर काही मिनिटे सभागृहात दाखल झाला. या प्रकारामुळे 4 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Advertisements

या आठवड्याच्या सुरुवातीला योगी आदित्यनाथ बस्ती जिल्ह्यातील अटलबिहारी वाजपेयी सभागृहात एका कार्यक्रमाला उपस्थित होते. स्थानिक पोलीस स्टेशन तसेच इतर जिल्ह्यातील कर्मचारी सुरक्षा ड्युटीवर तैनात करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या 45 मिनिटे अगोदर एक परवानाधारक रिव्हॉल्व्हर असलेला व्यक्ती प्रेक्षागृहात दाखल झाला. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला. त्यामुळे एसआय विंध्याचल, एसआय हरी राय, शिवधनी, राम प्रकाश या चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर एसआय रमाशंकर मिश्रा, वरुण यादव , अवधेश कुमार यांच्या निलंबनासाठी पोलीस अधीक्षकांनी वरिष्ठांना पत्र लिहीले आहे.

Related Stories

पदक निश्चित! रवीकुमार दहियाचा अंतिम फेरीत प्रवेश

datta jadhav

‘डेक्‍सामेथासोन’ कोरोनावर रामबाण औषध; मृत्यूदर घटविते

datta jadhav

भारतीय सैनिकांनी घडवले शत्रुत्वापेक्षा माणुसकीचे दर्शन

Patil_p

चिंताजनक : भारतात मागील 24 तासात 52,123 नवे कोरोना रुग्ण; 775 मृत्यू

Rohan_P

माजी क्रिकेटपटू, उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचं कोरोनानं निधन

Abhijeet Shinde

राज्य सरकारचा मोठा निर्णय;पूरग्रस्तांसाठी कायमस्वरुपी उपायांसाठी ११ हजार ५०० कोटींची मंजुरी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!