तरुण भारत

अनन्या पांडेच्या चौकशीनंतर NCB चा मोठा खुलासा

प्रतिनिधी /मुंबई

मुंबई ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Drugs Case) अभिनेता शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खान (aryan khan) सध्या जेलमध्ये आहे. याच प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचं (Ananya Panday) नाव समोर आलं आहे. गुरुवारी अभिनेता चंकी पांडेची (chunky pandey) मुलगी अनन्या पांडे हिच्या घरी एनसीबीने छापे टाकले. एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने (NCB) अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले. अहवालानुसार, पथकाने अनन्याच्या घरातून काही वस्तू देखील घेतल्या आहेत. यांनतर तिला चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावलं होत. त्यानुसार अनन्य चोकशीसाठी दाखल झाली होती. यावेळी तिच्यासोबत तिचे वडील चंकी पांडे सोबत होते.

अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीने चौकशीसाठी बोलावल्याने मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला आता एक नवं वळण लागलं आहे. गुरुवारी एनसीबीकडून अनन्याची साधारण तीन तास चौकशी सुरू होती. आजही तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

याबद्दल इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीने आर्यन आणि अनन्या यांचे काही चॅट्स मिळवले आहेत. या चॅट्समधून असं दिसत आहे की, अनन्या आर्यनला गांजा मिळवून देण्यासाठी तयार होती. या चॅट्सबद्दल एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला विचारलं असता, आपण केवळ आर्यनची थट्टा करत होतो, असं उत्तर अनन्याने दिलं आहे.

Advertisements

Related Stories

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित

Sumit Tambekar

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार: शपथविधी होण्यापूर्वीच राज्यात समर्थकांची निदर्शने

Abhijeet Shinde

अमरावतीत ‘सारी’चे 22 रुग्ण

prashant_c

पटना : कोरोना तपासणीसाठी आयसीएमआरकडून ‘कोबास 6800’ मशीन

Rohan_P

इंधन भडका; सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

Rohan_P

एका आठवडय़ात अश्लील आशय काढा

Patil_p
error: Content is protected !!