तरुण भारत

भोगावती कारखाना ३००३ रुपये एकरक्कमी देणार

अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील सडोलीकर

भोगावती/प्रतिनिधी

Advertisements

शाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचा चालू वर्षांची एफआरपी प्रतिटन ३००३ रुपये एकरक्कमी देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी एन पाटील सडोलीकर यांनी शुक्रवारी केली.

कारखान्याचे संचालक धिरज डोंगळे व भाग्यश्री डोंगळे यांच्या हस्ते चालू ऊस गळीत हंगामाचा बाँयलर अग्नी प्रदिपन शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी आमदार पाटील अध्यक्ष पदावरून बोलत होते. कामगरांच्या दिवाळी बोनसबाबत चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. साखर दर असेच राहिले तर पुढील वर्षी ऊसबिलासाठी कर्ज काढावे लागणार नाही. भविष्यात जास्तीत जास्त ऊस दरासाठी को जनरेशन, ईथेनाँल आदी प्रकल्प हाती घ्यावे लागणार आहेत, असे ते म्हणाले.

स्वागत व प्रास्ताविक संचालक प्रा एस ए पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानिदेवी साळुंखे, गोकुळ चे माजी संचालक पी डी धुंदरे, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, सर्व संचालक मंडळ, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, जि प सदस्य पांडुरंग भांदिगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : महापालिकेच्या ४४ गाळेधारकांच्या याचिका नामंजूर

Abhijeet Shinde

हज यात्रेच्या फॉर्ममधील इन्कम टॅक्स रिटर्नची अट रद्द करा : जहांगीर हजरत

Abhijeet Shinde

कोगे येथे गरजू लोकांना पुरणपोळी दान करत साजरी केली होळी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार कायम

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तूचे पार्सल आढळल्याने खळबळ

Abhijeet Shinde

गोकुळच्या राजकारणाला राजधानीत उकळी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!