तरुण भारत

कुपवाड एमआयडीसीत तरुणाला काठी व दगडाने बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा

कुपवाड / प्रतिनिधी 

किरकोळ कारणावरुन दोघांनी मिळून एका तरुणाला काठी व दगडाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार कुपवाड एमआयडीसीत घडला आहे. ‘तू आमच्याकडे रागाने का बघतोस ? असे विचारुन प्रवीण अशोक धायगुडे (रा.कोंडके मळा, बामणोली) याला मारहाण करून जखमी केले आहे.

याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी संशयित नितीन दुधाळ व प्रकाश माळी दोघे रा.मायाक्कानगर, बामणोली यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण धायगुडे हा मंगळवारी कुपवाड एमआयडीसीतून घरी जात होता. यावेळी मायाक्कानगर येथील नितीन दुधाळ व प्रकाश माळी हे दोघे समोरून सायकलवरून आले. दोघांनी मिळून धायगुडेला रस्त्यावर अडवले आणि ‘तू आमच्याकडे रागाने का बघतोस ? असे विचारुन काठी व दगडाने बेदम मारहाण केली. यात धायगुडे जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी नागरिकांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.

Advertisements

Related Stories

कोरोनाच्या उच्चाटनासाठी सामाजिक संस्थानी योगदान द्यावे : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीकरांना मदतीचा हात

Abhijeet Shinde

जिल्हय़ात 1019 कोरोनामुक्त, नवे 749 रूग्ण

Patil_p

सांगली : पूर बाधित गावांसाठी पंधरा बोटी प्रदान

Abhijeet Shinde

सांगली : म्हैसाळ केंद्रातील ३३ आशा वर्कर्सना आरोग्य विम्याचे कवच

Abhijeet Shinde

मिरज शासकीय रूग्णालयातील बाह्य व आंतर रूग्ण विभाग ‘या’ तारखेला होणार सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!