तरुण भारत

नवाब मलिकांना धमकीचा फोन

ऑनलाईन टीम / मुंबई :

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांना टार्गेट करू नका, असा धमकीवजा फोन राजस्थानातून आल्याचा दावा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या फोननंतर मलिकांनी पोलिसांत तक्रार दिली असून, त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Advertisements

मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर नवाब मलिक एनसीबीवर सातत्याने आरोप करत आहेत. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या कुटुंबावरही मलिकांकडून शाब्दिक हल्ला होत आहे. मलिकांनी म्हटले आहे की, ठराविक लोकांना खोटय़ा प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि दुबई आणि मालदीवमध्ये खंडणी वसुल करण्यात आली. मलिक यांनी समीर वानखडेंचे दुबईतील हॉटेलमधील फोटो काल (21 ऑक्टोबर 2021) ट्विट केले आहेत.

यावर वानखेडेंनी प्रतिक्रिया देत हा दावा फेटाळून लावला आहे. मी दुबईला गेलो नव्हतो. सुट्टीसाठी मी माझ्या मुलांसह मालदीवला गेलो होतो. त्यासाठी मी सक्षम प्राधिकरणाकडून योग्य परवानगी घेतली असल्याचे वानखेडेंनी म्हटले आहे.

Related Stories

फेसबुकप्रकरणी लष्कराला दिलासा नाही

datta jadhav

ग्रामीण भागातील २० लाख कुटुंब व १ कोटी जनते पर्यंत संगणकपरिचालक पोहचवणार आरोग्य सेतु अँप

Abhijeet Shinde

”कोरोना आणि मराठा आरक्षणावर विधानसभा अधिवेशन बोलविले पाहिजे”

Abhijeet Shinde

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील 719 डॉक्टरांनी गमावला जीव!

Rohan_P

दिलासादायक : महाराष्ट्रात मागील 24 तासात 11,077 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

“पुण्यात महाविकास आघाडीचं एक काम दाखवा आणि ३० हजारांचं बक्षीस मिळवा”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!