तरुण भारत

…त्या धाडींबद्दल अजित पवार उत्तर देऊ शकले नाहीत

ऑनलाईन टीम / मुंबई :

साखर कारखान्यांविषयी खोटी आकडेवारी देऊन भ्रष्टाचाराचे खोटे आरोप होत असल्याचे सांगत अजित पवारांनी पत्रकारांसमोर तब्बल 64 कारखान्यांची यादी ठेवली. जनतेची दिशाभूल करण्याचा हा त्यांचा प्रोफेशनल प्रयत्न होता. अजित पवार, पार्थ पवार, अजित पवारांच्या बहिणी, अजित पवारांचे बिझनेस पार्टनर यांच्या घरी इन्कमटॅक्सच्या धाडी 10 दिवस चालल्या. त्यामधून 1000 कोटींची बेनामी संपत्ती समोर आली. 100 हून अधिक कोटी रुपये अजित पवार यांच्या कंपन्यांमध्ये आले. त्याबद्दल अजित पवार उत्तर देऊ शकले नाहीत, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Advertisements

सोमय्या म्हणाले, जरंडेश्वर कारखाना अजित पवारांनी बेनामी पद्धतीने घेतला आहे. जरंडेश्वर विकत घेणाऱया गुरू कमोडिटीला 32.5 कोटी रुपयांची अर्धी रक्कम अजित पवारांच्या स्पारकलिंग सोईल आणि गुप कंपनीने दिली. मागील दहा वर्ष हा कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवत आहे. ज्याचे मालक अजित पवार, त्यांच्या बहिणी आणि सुनेत्रा पवार आहेत. आजही हा कारखाना अजित पवारच चालवत आहेत.

Related Stories

केरळनंतर पंजाब विधानसभेचा CAA विरुद्ध ठराव

prashant_c

प्रलंबित जीएसटी भरपाई देण्याचे अर्थमंत्र्यांचे आश्वासन : मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Shinde

मंत्रिमंडळ विस्तार आज?

Patil_p

चुका मान्य करा, तज्ञांचा सल्ला ऐका

Amit Kulkarni

मुथ्थूट फायनान्सचे पदाधिकारी जखमी

Patil_p

अर्निया सेक्टरमध्ये दिसली ड्रोनसदृश्य वस्तू

datta jadhav
error: Content is protected !!