तरुण भारत

माणच्या सुपुत्राला राजस्थानमध्ये वीरमरण

वार्ताहर / लोधवडे :

सातारा जिल्ह्यातील संभूखेड (ता. माण) गावचे सुपूत्र सचिन काटे देशसेवा करत असताना राजस्थानमध्ये हुतात्मा झाले. हुतात्मा सचिन काटे यांचे पार्थिव शुक्रवारी रात्री पुण्यामध्ये दाखल झाले. त्यानंतर ते त्यांच्या जन्मगावी पाठवण्यात येणार आहे. सचिनला वीरमरण आल्याची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली आहे. सचिनचे पार्थिव कधी येणार याकडे नागरिक डोळे लावून बसले आहेत.

Advertisements

संभूखेड (ता. माण) या छोटय़ाशा जवळपास 950 लोकसंख्येच्या व जेमतेम 150 कुटुंबाच्या गावात सामान्य रंगकाम व शेतकरी सामान्य कुटुंबात विश्वनाथ व उषा काटे या दाम्पत्याच्या पोटी सचिनचा 15 जून 1997 रोजी जन्म झाला. विश्वनाथ काटे यांना दोन मुले. मोठा मुलगा सचिन राजस्थानमध्ये देशसेवेसाठी कार्यरत होते तर लहान रेवन काटे हा आसाममध्ये देशसेवेसाठी कार्यरत आहेत.

हुतात्मा सचिन काटे याचे प्राथमिक शिक्षण हे गावातीलच जिल्हा परिषद शाळेत, 10 वीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण तेथेच घेतले. 11 वी व 12 वी विज्ञान शाखेमधून महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी दहिवडी कॉलेज दहिवडी येथे कला शाखेत प्रवेश घेऊन एन.सी.सी. जॉईन केली. मात्र याच वर्षी 2016 मध्ये तो मिलीटरीमध्ये भरती झाला. शालेय जीवनात असताना त्याला कबड्डी खेळाची आवड होती. विज्ञान शाखेमधून उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्याने टेक्नीकलमधून रणगाडा ट्रेड मॅकेनिकल म्हणून भरती झाला. सिकंदराबाद येथे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तो राजस्थानमध्ये देशसेवेसाठी कार्यरत होता. लहानपणापासून देशसेवेची ओढ असल्याने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 19 व्या वर्षी आर्मीमध्ये भरती झाले. लहान भाऊ रेवन काटे हा देखील काही वर्षापूर्वी आर्मीमध्ये दाखल झाला आहे.

Related Stories

शेतकऱ्याला शब्द आणि आमदारांचा स्वःखर्च

Abhijeet Shinde

सातारा : जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा

datta jadhav

साताऱयात एसटी कर्मचाऱयांचा संप दडपण्याचा प्रयत्न

Patil_p

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा एकाचा प्रयत्न

Abhijeet Shinde

साताऱ्यात नवरात्र उत्सवाची नियमावली जारी

Abhijeet Shinde

मद्यपी टँकर चालक अन् साताऱयात हलकल्लोळ

Patil_p
error: Content is protected !!