तरुण भारत

राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये इच्छूकांच्या याद्या तयार; पण जागेचा तिढा कायम

प्रतिनिधी / सातारा :

जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेल टाकण्याचा निर्णय अंतिम झाला आहे. या पॅनेलमध्ये भाजपाचे आमदार शिवेंद्रराजेंना सामावून घेण्याचाही निर्णय झाला आहे. दरम्यान, पॅनेलच्या इच्छूकांच्या याद्या तयार असून जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आमदार शिवेंद्रराजेंनी पाच जागांची मागणी केली आहे. तर चार जागा आमदार मकरंद पाटील यांनी मागितल्या आहेत. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही जागांची मागणी केली आहे. त्यामुळे सगळय़ांचा तिढा रामराजे कसे सेडविणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, विरोधकांनी अद्यापही चुप्पी साधली आहे.

Advertisements

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून परफेक्ट प्लॅनिंग करण्यात आले आहे. पुण्यामध्ये सातारच्या जिल्हा बँकेच्या अनुषंगाने बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे पॅनेलवर निर्णय झाला. त्याच पॅनेलमध्ये भाजपाचे आमदार शिवेंद्रराजेंना सोबत घ्यायचा निर्णय झाला. परंतु जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे.

Related Stories

केंद्रिय मंत्री आठवलेंनी पिकांच्या नुकसानीची पहाणी

Patil_p

पर्यावरणासाठी पालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या सायकल रॅली उत्स्फुर्त प्रतिसाद

Patil_p

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Patil_p

गोगावलेवाडी ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून

Amit Kulkarni

सातारा जिल्ह्यात आज 67 नागरिकांना डिस्चार्ज, 464 नमुने पाठवले तपासणीला

Abhijeet Shinde

सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तुंची कल्पनाराजेंनी केली पाहणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!