तरुण भारत

दिव्यांग युवकांना मिळणार लघुउद्योगासाठी अर्थसहाय्य

प्रतिनिधी / कोल्हापूर

बेरोजगार दिव्यांग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वत:चा व्यवसाय, धंदा, उद्योग सुरु करण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य बॅंकेमार्फत परतफेडीच्या कर्जाच्या स्वरुपात बीज भांडवल उपलब्ध करुन देण्याची योजना आहे. अंध, अल्पदृष्टी, कर्णबधिर, अस्थीव्यंग व मतिमंद या प्रवर्गासाठी ही योजना लागू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली आहे.

Advertisements

योजनेच्या प्रमुख अटी

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. डोमीशीएल सर्टिफिकेट आवश्यक.

दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे सक्षम प्राधिकाऱयाचे दिलेले प्रमाणपत्र आवश्यक.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख रूपयांपेक्षा जास्त नसावे. तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक .

अर्जदाराचे वय वर्षे 18 ते 50 असावे. वयाचा दाखला आवश्यक (शाळा सोडल्याचा दाखला)
-सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार इतर आवश्यक कागदपत्रे. (अर्जासोबतची कागदपत्रांची सूची पहावी)

योजनेचे स्वरुप

1 लाख 50 हजार रुपयांपर्यत प्रकल्प खर्चाची मर्यादा आहे. 20 टक्के एवढी रक्कम अनुदान स्वरुपात व उर्वरित 80 टक्के रक्कम बॅकेकडून कर्ज स्वरुपात मंजूर करण्यात येते.

अर्ज करण्याची पध्दत –

विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक व त्या सोबत कागदपत्रे सादर करणे आवश्यक.

योजनेची वर्गवारी –
-दिव्यांग व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे.

अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी , जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे संपर्क करावा.

Related Stories

शेतीच्या पाण्याला धक्का लागणार नाही : खासदार धैर्यशील माने

Abhijeet Shinde

जिल्हा सिमेवरील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशाची गरज

Abhijeet Shinde

शहरातील सर्व दुकाने आजपासून सम-विषम तारखांना उघडणार

Abhijeet Shinde

वाढीव वीज बिले रद्द करा ; करवीर शिवसेनेचे निवेदन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : इस्लामपुरातून शिरोलीत आलेली महिला सीपीआरमध्ये दाखल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सुट्टीच्या दिवशी उपायुक्त ‘ऑन ड्युटी’!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!