तरुण भारत

मास्क घालायला सांगितले, बँकेतील खाते बंद केले

बँकेच्या सुरक्षा रक्षकाने एका खातेधारकाला बँकेत प्रवेश करताना मास्क घाला असे सांगितले. याचा त्या खातेधारकाला भयंकर संताप आला आणि त्याने संतापाच्या भरात बँकेतील खातेच बंद करून टाकले. ही घटना चीनमधील आहे. चिनी सोशल मीडियावर या घटनेच्या व्हिडिओ चित्रणाला प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. ही बँक शांघाय शहराच्या मध्यवर्ती भागात आहे.

बँक खाते बंद करणारी व्यक्ती श्रीमंत असून सोशल नेटवर्कवर विवो या नावाने प्रसिद्ध आहे. या व्यक्तीचे या बँकेत 50 लाख युवान (5 कोटी 84 लाख 74 हजार 350 रुपये) होते. ही सर्व रक्कम त्याने एकटाकी काढली. बँकेच्या सुरक्षा रक्षकाने आपल्याला मास्क घालण्यास सांगितल्याने आपला अपमान झाला आहे. त्यामुळे असा अपमान करणाऱया बँकेत मी खाते ठेवणार नाही, असे त्याने बँकेच्या व्यवस्थापकाला ठणकावले. बँकेच्या व्यवस्थापकाने त्याला खाते बंद न करण्याविषयी अनेकदा विनवूनही उपयोग झाला नाही. आपल्या खात्यातील सर्व रक्कम बँक कर्मचाऱयांनी हाताने मोजून आपल्याला द्यावी, असेही फर्मान त्याने काढले. अखेरीस बँक कर्मचाऱयांनी त्यांची कामे सोडून त्याची इच्छा पूर्ण करावी लागली. त्याच्या या तऱहेवाईक पणाची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. त्याच्या फॉलोवर्सची संख्या 17 लाखपर्यंत पोहोचली आहे. सोशल मीडियावर त्याच्या या कृतीचे समर्थन करणाऱयांची संख्याही बरीच मोठी आहे असे सांगण्यात आले.

Advertisements

Related Stories

व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागारपदी नीरा टंडन यांची नियुक्ती

Patil_p

आक्रमण चीनला महागात पडणार!

Patil_p

चीन : वुहानमधील सर्व शाळा मंगळवारपासून होणार सुरू

datta jadhav

अमेरिकेच्या कंपन्यांवर चीनकडून बंदी

Patil_p

अध्यक्षांचा पुत्र घेणार लस

Patil_p

सॅनिटायजरचा वापर करावा, परंतु जपून!

Patil_p
error: Content is protected !!