तरुण भारत

आयआयटीच्या प्राध्यापकाला रोसेनब्लुथ पुरस्कार

कानपूर येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) येथे प्राध्यापिका असणाऱया दुतिका वत्स्य यांनी अमेरिकेचा प्रतिष्ठेचा ब्लॅकवेल रोसेनब्लुथ पुरस्कार पटकाविला आहे. हा पुरस्कार मिळविणाऱया त्या आशिया खंडातील एकमेव उमेदवार आहे. सांख्यिकी व कॉम्प्युटेशन मॉडेलच्या मार्जिनल एररवर त्यांचे संशोधन आहे. हा पुरस्कार मिळविणाऱया त्या एकमेव भारतीय महिला आहेत.

मार्जिनल एरर या विषयात त्यांनी लावलेले शोध इतर क्षेत्रांमध्येही उपयुक्त ठरत आहेत. त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे कानपूर आयआयटी आणि भारताचेही नाव जगभर होत आहे. त्यांच्याशिवाय हा पुरस्कार अमेरिकेतील दोन, इंग्लंडमधील दोन आणि कॅनडातील एका विशेतज्ञाला देण्यात आला आहे. वत्स यांनी ‘मार्कोव्ह चेन माँटेकारलो अल्गोरिदम’ या विषयात प्रावीण्य मिळविलेले आहे. आयआयटीमध्ये त्या गणित आणि संख्या शास्त्र शिकवितात. मार्जिनल एररसंबंधी त्यांच्या संशोधनामुळे कमीतकमी स्रोतांचा उपयोग करून जास्तीतजास्त लाभ कसा मिळविता येईल. याची काही सूत्रे निर्माण झाली आहे. ही सूत्रे यंत्रनिर्मिती, इलेट्रॉनिक्स, औषध निर्मिती, रसायनांचे उत्पादन इत्यादी क्षेत्रांमध्ये उपयोगी पडू शकतात. यामुळे याच क्षेत्रातील संशोधनासाठी लागणारा वेळ आणि खर्च दोन्ही वाचू शकतो असे दिसून आले आहे. त्यांच्या संशोधनाचे कौतुक जगभर होत आहे.

Advertisements

Related Stories

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

prashant_c

नव्या रुग्णांचा 194 दिवसांमधील नीचांक

Patil_p

राजस्थानात एकाच परिवारातील 9 जणांना ओमिक्रॉन

Patil_p

‘कोवॅक्सिन’ डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी

datta jadhav

अखिलेश यादव यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक न लढवण्याचा घेतला निर्णय

Abhijeet Shinde

देशात सक्रिय रुग्ण 18 लाखांखाली

Patil_p
error: Content is protected !!