तरुण भारत

छतरी गावावर ‘केक’ची छाया

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळनजीक असणारे छतरी हे गाव केवळ मध्यप्रदेश किंवा भारतातच नव्हे तर अलीकडच्या काळात विदेशांमध्येही त्याच्या स्वादीष्ट केकसाठी प्रसिद्धी पावत आहे. या गावातील 250 हून अधिक युवक अर्थात युवकांची निम्म्याहून अधिक लोकसंख्या केवळ केक तयार करण्याचा व्यवसाय करते. या गावची लोकसंख्या केवळ 1800 आहे. या गावात 1 हजाराहून अधिक प्रकारचे केक तयार होतात आणि ते भारतातील अनेक मोठय़ा शहरामध्ये तसेच विदेशातही पाठविले जातात. या युवकांनी उत्कृष्ट गुणवत्तेचे पौष्टिक आणि चवदार केक तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले असून तसे केक इतरत्र तयार होऊ शकत नाही अशी ख्यातीही त्यांनी प्राप्त केली आहे.

मुख्य म्हणजे यापैकी बहुतेक युवक काही वर्षांपूर्वी बेरोजगार होते. नोकरीसाठी प्रयत्न करून निराश झालेले होते. तथापि या निराशेतून काहीही साध्य होणार नाही. हे समजल्यानंतर त्यांनी बेकरी उत्पादने तयार करण्याकडे मोर्चा वळविला. अल्पशा भांडवलावर प्रथम पाच वर्षापूर्वी व्यवसाय सुरू केला. नंतर अल्पावधीतच केक बनविण्याचे कौशल्य साध्य केले. आज त्यांना सन्मानाने जगण्या इतके उत्पन्न या व्यवसायातून मिळत आहे. विदेशातून मोठय़ा प्रमाणावर डॉलरची कमाईही होत आहे. इच्छा आहे तेथे मार्ग आहे या म्हणीचे प्रत्यंतर त्यांनी आणून दिले आहे.

Advertisements

Related Stories

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 30 लाखाचा टप्पा

datta jadhav

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

Patil_p

5, 10, 100 च्या जुन्या नोटा चलनातून होणार बाद

Patil_p

येथे घरांना मिळते मुलींचे नाव

Patil_p

एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 1 लाख 41 हजार कोटींवर

Patil_p

शंकरसिंग वाघेलांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

Patil_p
error: Content is protected !!