तरुण भारत

भारताचे यश जगाला प्रेरणा देईलभारताचे यश जगाला प्रेरणा देईल

100 कोटी लसीकरणासंबंधी अमेरिकेकडून प्रशंसा

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisements

भारताने नुकताच लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार केला आहे. यासंबंधात अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींनी भारताची प्रशंसा केली असून भारताचे यश कोरोना विरुद्धच्या संघर्षात साऱया जगाला प्रेरणा देईल, अशी भलावण त्यांनी केली. अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाचे सदस्य आणि सभागृहाच्या विदेश व्यवहार समितीचे अध्यक्ष ग्रेगरी मीक्स यांनी त्यांच्या संदेशात भारताचे अभिनंदन केले आहे.

भारत औषधे आणि लसींच्या निर्मितीत जगात सर्वात आघाडीवर आहे. कोरोना लसीकरणात भारताने प्राप्त केलेले हे यश जगाला योग्य मार्ग दाखविणारे आहे, असे त्यांनी आपल्या संदेशात प्रतिपादन केले. सिनेटर स्टीव्ह डायन्स यांनीही ट्विट करुन भारताला शुभेच्छा दिल्या. काँगेसच्या सदस्या रॉबिन केली यांनी भारताची प्रशंसा केली. किती प्रमाणात लसीकरण होते यावर कोरोनावर जग किती लवकर नियंत्रण मिळवेल हे ठरणार आहे. भारताने गाठलेला 100 कोटींचा टप्पा त्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद आहे. याचा भारताला कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी निश्चितच लाभ होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

279 दिवसात लक्ष्यपूर्ती

भारताने 16 जानेवारीला आपले देशव्यापी लसीकरण अभियान हाती घेतले. तेव्हापासून 279 व्या दिवशी 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला. यासाठी केंद्र सरकारने ‘व्हॅक्सिन मैत्री’ नामक जनजागृती अभियान यासाठी हाती घेतले होते. भारताने आतापर्यंत 6.66 कोटी लसी कॅनडा, ब्राझील, ब्रिटन, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, ब्राझील, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, युपेन आणि बहारीनसह 95 देशांना निर्यात केल्या आहेत.

भारताने लस निर्यात केली आहे. विदेश व्यवहार समितीचा संदेश

कोरोना विरुद्धच्या संघर्षात आपण सर्वांनी आपली भूमिका पार पाडली पाहिजे. भारताने या दिशेने प्रशंसनीय प्रयत्न केले आहेत. 100 कोटीचा टप्पा पार करणे हे आव्हानात्मक होते, पण भारताने हे लक्ष्य साध्य केले, ही जगाच्या दृष्टीनेही भूषणास्पद बाब असल्याचे प्रतिपादन अमेरिकेच्या विदेश व्यवहार समितीने केले.

Related Stories

विषाणूमधील म्युटेशन युरोपमधील दुसऱया लाटेचे कारण

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 99 लाखांवर

datta jadhav

रशिया, ब्राझीलमधील संकट कायम

Patil_p

अफगाणिस्तानात परतला लादेनचा सहकारी

Patil_p

एका चुकीमुळे गमावले 17 लाख फॉलोअर्स

Patil_p

पॅलेस्टाईनच्या हल्ल्यात केरळच्या महिलेचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!