तरुण भारत

काँग्रेस-राजद युतीचा बिहारमध्ये ‘काडीमोड’

संघाच्या भाजपला कानपिचक्या

पटना / वृत्तसंस्था

Advertisements

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेसची युती तुटली आहे. आता राजदसोबत कधीही युती होणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस सर्व 40 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी घोषणा काँग्रेसचे बिहार राज्य प्रभारी भक्त चरणदास यांनी केली. राजदने महागठबंधन धर्माचे पालन केले नाही, त्यामुळे काँग्रेस पोटनिवडणुकीत पूर्ण ताकदीने लढत आहे. आमचे सर्व नेते बिहारमध्ये पोहोचले असून जोरदार प्रचार करत आहेत, असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान, याप्रसंगी काँग्रेसने तेजस्वी यादव यांच्यावर काही आरोप केल्यानंतर राजदच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले. काँग्रेसने केलेले आरोप पूर्णपणे विसंगत असल्याचा दावा राजदचे प्रवक्ते मनोज झा यांनी प्रत्युत्तर देताना केला. सध्या बिहारमधील तारापूर आणि कुशेश्वरस्थान या दोन विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होत आहे. राजदने दोन्ही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यानंतर काँग्रेसने दोन्ही जागांवर आपले उमेदवारही दिले आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने कुशेश्वरस्थानमधील एक जागा लढवली होती.

Related Stories

कृषी कायदे आंदोलन; दोन आठवड्यात तोडगा काढा; SC ची केंद्राला ताकीद

Abhijeet Shinde

शेवटी हीच जनता सरकार संपवते : राहुल गांधी

Abhijeet Shinde

पुढील आठवड्यापासून ‘स्पुटनिक-व्ही’ मिळणार

Amit Kulkarni

लखीमपूर हिंसाचारात गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा मुख्य आरोपी

datta jadhav

पंतप्रधान झालात तर पहिला कोणता निर्णय घ्याल?; राहुल गांधींनी दिले उत्तर

Abhijeet Shinde

‘बिटकॉईन’कडे दुर्लक्ष करत धैर्याने काम करा

Omkar B
error: Content is protected !!