तरुण भारत

समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत, सेन पराभूत

वृत्तसंस्था/ ओडेन्सी

येथे सुरू असलेल्या डेन्मार्क खुल्या सुपर 1000 आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या समीर वर्माने डेन्मार्कच्या तृतीय मानांकित ऍन्टोनसेनचा पराभव करत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र भारताच्या लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात आले.

Advertisements

गुरुवारी पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताच्या 28 व्या मानांकित समीर वर्माने डेन्मार्कच्या ऍन्टोनसेनचा 50 मिनिटांच्या कालावधीत 21-14, 21-18 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. मध्य प्रदेशच्या 27 वर्षीय समीर वर्माने 2018 बॅडमिंटन हंगामात विश्व टूर बॅडमिंटन स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध करताना तीन स्पर्धा जिंकल्या होत्या. समीर वर्माचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना 33 वर्षीय सुगीयार्थोविरुद्ध होणार आहे.

पुरुष एकेरीच्या दुसऱया एका सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सलसनने भारताच्या लक्ष्य सेनचा 21-15, 21-7 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. महिलांच्या विभागात भारताच्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना थायलंडच्या ओ. बुसानेनवर 21-16, 12-21, 21-15 अशी मात केली. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना कोरियाच्या सेयाँगविरुद्ध होणार आहे.

Related Stories

सेरेना, ओसाका, गॉफ तिसऱया फेरीत

Patil_p

टी-20 क्रमवारीत मलानचा विक्रम

Omkar B

स्पेन संघात बुस्केटचे पुनरागमन

Patil_p

पहिल्या वनडेत इंग्लंडचा आयर्लंडविरुद्ध विजय

Patil_p

ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतून त्सोंगाची माघार

Patil_p

उज्ज्वल भविष्यासाठी पद्म पुरस्कार दीपस्तंभासमान

Patil_p
error: Content is protected !!