तरुण भारत

मॉर्निंग वॉक करताना अपघातात शिक्षकाचा मृत्यू

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालुक्यातील सैदापूर येथे शुक्रवारी सकाळी मॅर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत म्हसवे शाळेचे मुख्याध्यापक अनिल दरेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत पुढे चालत असलेले दशरथ फरांदे जखमी झाले असून त्यांना साताऱयातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

 याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मयत अनिल दरेकर (वय 53) हे भिवडी (ता.जावली) गावचे रहिवाशी होते. ते म्हसवे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून ते दररोज मॅर्निंग वॉकला जात होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे मॅर्निंग वॉकला त्याचे सहकारी दशरथ फरांदे सोबत होते. सकाळी रस्त्याने वाहतूक कमी असल्याने फक्त मॅर्निग वॉकला आलेल्या नागरिकांची संख्या जास्त होती. हे दोघे सैदापूर येथे आल्यानंतर मागून एक भरधाव वेगाने चारचाकी गाडी आली. या गाडी चालकाने दोघांना धडक  देवून गाडी न थांबवता तो निघून गेला. या धडकेत अनिल दरेकर हे गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दशरथ फरांदे यांच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले.

 अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली असता दरेकर याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले. तर फरांदे याना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अज्ञात वाहनाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मॉर्निंग वॉकला जाताय सावधान…

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनलॉक लागू आहे. गुलाबी थंडी चालू झाली असल्याने मॅर्निंग वॉकला जाणाऱया नागरिकांच्या संख्येते वाढ झाली आहे. सकाळच्या वेळेत रस्त्याने वाहनांची संख्या कमी असते. यामुळे दुचाकी-चारचाकी वाहनधारक बेभान होवून वाहने चालवतात. रस्त्याने जाणाऱया नागरिकांना धडक देतात. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यामुळे मॅर्निग वॉकला जाताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे. तसेच वाहनधारकांनी वाहनांच्या वेगाला मर्यादा घातली पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Stories

साताऱ्यात लसीसाठी रात्रभर रांगा

datta jadhav

फास्टटॅग मुळे टोलवरील वाहतूक कोंडी थांबली

Patil_p

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे सोमवारी आंदोलन

Patil_p

ढेबेवाडीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची जागेवरच कोरोना टेस्ट

Abhijeet Shinde

गृहराज्यमंत्र्यांच्या तालुक्यात भर पावसात कारपेटचे काम

datta jadhav

सातारा : नागठाणे भागात ४९ गावातील मंडळांचा ‘एक गाव एक गणपती’ला प्रतिसाद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!