तरुण भारत

‘टीईटी’साठी जिल्हय़ात 2779 उमेदवारांची परीक्षेसाठी नोंदणी

राज्य परीक्षा परिषदेकडून 21 नोव्हेंबरची तारीख जाहीर

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

नांदेडमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे कारण पुढे करून ‘टीईटी’ परीक्षा तिसऱयांदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही परीक्षा येत्या 30 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण ‘टीईटी’ दिवाळीनंतरच 21 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने जाहीर केल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

  रत्नागिरी जिल्ह्य़ात 2 हजार 779 उमेदवारांनी टीईटीसाठी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने 19 जानेवारी 2020 नंतर टीईटी परीक्षा  झाली नव्हती. यानंतर आधी 10 ऑक्टोबर रोजी परीक्षेची तारीख जाहीर झाली होती. यासाठी राज्यभरात 3 लाख 30 हजार 542 उमेदवारांनी नोंदणी केली होती. मात्र या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा होती. एकाच दिवशी दोन परीक्षा  नको म्हणून टीईटी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही तारीख बदलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

   नांदेड जिल्ह्य़ात देगलूर बिलोली या विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे या दिवशी टीईटी घेणे शक्य होणार नाही.    त्यामुळे आता ही परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी  होणार आहे. त्यानुसार सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी 26 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 हा 21 नोव्हेंबर रोजी स. 1030 ते दु. 1 वाजेपर्यंत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 ची  वेळ 21 नोव्हेंबर रोजी दु. 2 ते सायं. 4.30 वा. ठेवण्यात आल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

Related Stories

जिल्हा बँकेस ‘बँको ब्ल्यू रिबन 2020’ पुरस्कार

NIKHIL_N

किफायतशीर शेळीपालनासाठी 16 तरूणांचा पुढाकार

Patil_p

परप्रातीय ट्रॉलर्स रोखण्यासाठी एकत्र येणे गरजेचे

Patil_p

दुसऱ्या डोसची प्रतीक्षा संपली

NIKHIL_N

शिव बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्र अडकलेय गैरसोयींच्या गर्तेत!

Patil_p

मिनी महाबळेश्वर गारठले!

Patil_p
error: Content is protected !!