तरुण भारत

कोलमोरोडवासियांचे दोन दिवस पाण्याविना हाल

जलवाहिनी फुटण्याच्या सततच्या प्रकारांनी स्थानिक संतप्त, 40 वर्षे जुनी वाहिनी बदलण्याची मागणी

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

कोलमोरोड आणि आसपासच्या भागातील रहिवाशांसाठी पाण्याच्या समस्या कधीही न संपणाऱया बनल्या असून कोलमोरोड येथील जिल्हा वाचनालयासमोरील एक जलवाहिनी गुरुवारी फुटली. या भागातील पाणीपुरवठय़ात बिघाड होणे ही नेहमीची घटना बनली आहे आणि अधिकारी वर्गाला लोकांना सहन कराव्या लागणाऱया त्रासांचे पडून गेले नसल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहे. शुक्रवारी सायंकाळी खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत झाला.

गुरुवारी दुपारी कोलमोरोड येथील दक्षिण गोवा जिल्हा ग्रंथालयासमोरील 200 एमएम व्यासाची 40 हून अधिक वर्षे जुनी पाईपलाईन फुटली, ज्यामुळे कोलमोरोडसह आसपासच्या काही भागांना पाणीपुरवठा झाला नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाला पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी तत्काळ कळवण्यात आले आणि संबंधित अभियंत्याने पुष्टी केली की, हे मोठे ब्रेकडाऊन आहे, अशी माहिती स्थानिक रहिवासी व माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शुक्रवारीही नळ कोरडे

जलवाहिनीला तडे गेल्याने सर्वत्र पाणी साचून रस्ता खराब झाला. त्यामुळे तेथील रहिवासी आणि रस्ता वापरणाऱयांसाठी ही आणखी एक समस्या बनली, असे कुतिन्हो पुढे म्हणाले. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत कामगार जलवाहिनीला तडे गेलेल्या जागेच्या शोधात परिसर खोदताना दिसले. साईटवरील देखभाल ठेकेदाराने गुरुवारी रात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र त्याप्रमाणे दुरुस्तीकाम पूर्ण न होऊन शुक्रवारीही काम करावे लागले. त्यामुळे शुक्रवारी परिसरतील नळ कोरडे पडले. मोठे ब्रेकडाऊन असल्याने काम पूर्ण होण्यास किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही असा पवित्रा नंतर कंत्राटदाराने घेतला.

आम्ही याआधीही जलवाहिनी वारंवार फुटण्याच्या कारणांबद्दल प्रश्न विचारला होता आणि आजपर्यंत आम्हाला फक्त एकच निमित्त ऐकायला मिळाले आहे की, पाईपलाईन जुनी आहे. आम्हाला कोणतेही योग्य कारण मिळत नाही, असे सांगून कुतिन्हो यांनी, संबंधित यंत्रणा जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी प्रयत्न करत नाही याबद्दल संताप व्यक्त केला. सदर जलवाहिनी उपयुक्त नसल्यास ती त्वरित बदलली जावी, अशी मागणी स्थानिकांनी उचलून धरली आहे.

स्थानिकांकडून निदर्शने

दरम्यान, कोलमोरोड येथील रहिवाशांनी माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दक्षिण जिल्हा ग्रंथालयासमोर 40 वर्षे जुनी पाण्याची सिमेंट पाईपलाईन बदलण्याची मागणी घेऊन निदर्शने केली. बेनेदिता फुर्तादो, सिंथिया फर्नांडिस, झबीर शेख, हकीम रावलतार, ट्रुडी डिसिल्वा, कोनी आंद्राद इत्यादींसह 50 पेक्षा जास्त रहिवासी यावेळी उपस्थित होते.

कोलमोरोड येथील जलवाहिनीला गुरुवारी तडे गेल्यानंतर शुक्रवार सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने स्थानिक आमदार दिगंबर कामत यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शेवटी शुक्रवारी सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने कोलमोरोडवासियांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Related Stories

केपेतील कोरोनाबाधितांच्या संख्येत भर

Patil_p

साखळी परिसरातील मतीमंद मुलांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कीटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण..!

Patil_p

नामवंत चित्रकार वामन नावेलकर निवर्तले

Amit Kulkarni

धनगर समाजाला ‘एसटी’ दर्जासंदर्भात ‘आरजीआय’शी सकारात्मक चर्चा

Amit Kulkarni

कोरोना इस्पितळ उभारताना वैद्यकीय नियमांची पायमल्ली

Omkar B

निर्माल्य, कागदी व प्लास्टीक कचराकुंडय़ांची सोय

Omkar B
error: Content is protected !!