तरुण भारत

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील कोविड वॉर्ड बंद

‘शॅडो कौन्सिल फॉर मडगाव’कडून इस्पितळाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

शॅडो कौन्सिल फॉर मडगावने शुक्रवारी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्ड बंद केल्याबद्दल हातात फलक घेऊन निषेध व्यक्त केला. निमंत्रक सावियो कुतिन्हो, ऍड. स्नेहल वंसकर, जोस मारियो मिरांडा, आगुस्तीनो गामा, आल्बर्ट फर्नांडिस, झाबीर शेख, दामोदर वंसकर, टोनी फर्नांडिस आणि इतरांनी मडगाव येथील जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर जमून निदर्शने केली.

दक्षिण गोव्यातील रुग्णांच्या फायद्यासाठी किमान खाटा असलेल्या कोविड वॉर्डची मागणी यावेळी करण्यात आली. हॉस्पिसियो हॉस्पितळाचे नवीन जिल्हा रुग्णालयात स्थलांतर करणे निश्चितच स्वागतार्ह आहे, परंतु कोविड वॉर्ड बंद करणे अस्वीकारार्ह आहे. प्रवेशासाठी येणाऱया रुग्णांची कमी संख्या हे वॉर्ड बंद करण्याचे कारण सांगितले जाते. याचा अर्थ असा आहे की, दक्षिण गोव्यातील सक्रिय रुग्णांना त्रास सहन करावा लागेल. आरोग्य विभागाला दक्षिण गोव्यासाठी कोविड वॉर्ड स्थापित करणे ओझे वाटते का, असा प्रश्न कुतिन्हो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

शुक्रवारी सकाळी मला एक फोन कॉल आला, 90 वर्षांचा एक ज्ये÷ नागरिक कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. मी जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱयांकडे चौकशी केल्यावर जिल्हा रुग्णालयात कोणताही कोविड रुग्ण दाखल होऊ शकत नाही हे जाणून मला आश्चर्य वाटले, असे कुतिन्हो म्हणाले. जोस मारियो मिरांडा यांनी हॉस्पिसियो हॉस्पिटल सध्या रिक्त असल्याने तेथे कोविड रुग्णांसाठी एक वॉर्ड उभा करावा, असे सूचित केले.

राधा कवळेकर यांनी त्यांचे 90 वर्षांचे सासरे कोविड पॉझिटिव्ह असल्याने त्यांना इस्पितळात दाखल करणे आवश्यक आहे, असे सांगितले. आम्ही मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालय त्यांना दाखल करून घेईल. परंतु रुग्णाच्या वयाचे कारण पुढे करून तेथे प्रवेश नाकारण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

मये भु वि. नागरिक कृती समितीने आमदाराविरूध्द थोपटले दंड

Amit Kulkarni

पोलीस निरीक्षक सावंतांकडून पायलट, रिक्षाचालकांना आधार

Omkar B

ताळगाव श्री सातेरी देवीचा 8 पासून वर्धापन सोहळा

Patil_p

लोकप्रतिनिधींनी लोकहितासाठी वावरावे

Patil_p

जावडेकर यांनी मेळावलीकरांना मार्गदर्शन करावे

Patil_p

स्पेनचा जुआन गोंझालेज हैदराबाद एफसीला करारबद्ध

Amit Kulkarni
error: Content is protected !!