तरुण भारत

गोवा डेअरीचा नफा-तोटा आमसभेतून जाहीर करा अन्यथा निवडणूक घ्या

दुध उत्पादकांचा त्रिसदस्यीय समिती व कार्यकारी एमडीना ईशारा

प्रतिनिधी /फोंडा

Advertisements

गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या संलग्न 45 सोसायटीच्या अध्यक्षांनी गोवा डेअरीच्या लांबवणीवरील अनिर्णीत राहिलेल्य़ा  आमसभेवर तोडगा काढण्यासाठी खास आमसभा बोलावण्यात यावी अशी मागणीवजा निवेदन त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर व सहकार निबंधकाना वारंवार सादर केल्यानंतरही प्रशासकीय समिती व कार्यकारी एमडी केवळ यांच्यात समन्वयक नसल्याने सदर विषयावर कोणताच तोडगा निघत नसल्याचे चित्र दिसत आहे.

आमसभेबाबत प्रत्येकवेळी कोरोना महामारीचे कारण सांगत आमसभा पुढे ढकलण्याचे प्रकास सद्या सुरू आहेत. डेअरी संलग्न 176 सोसायटी सभासद त्यानंतर डेअरीचे सर्व खाते प्रमुख, लिपीक, सहाय्यक कर्मचारी, त्रिसदस्यीय समितीचे अधिकारी मिळून हा आकडा 210 पर्यंत पोचत असल्याचे कारण सांगत डेअरीच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर देत आहेत. तरीही डेअरीत पारदर्शकता व सुरळीत व्यवहारासाठी काही दुध उत्पादकांनी आमसभा तात्काळ घेण्याचा आग्रह धरलेला आहे.

प्रशासकीय समिती व कार्यकारी एमडी अनिल फडते यांच्यामध्ये समन्वयक नसल्याने डेअरी नुकसानीच्या खाईत जात असल्याचा संशय काही दुध उत्पादकांनी  व्यक्त केलेला आहे. तसेच याप्रकरणी डेअरीवर नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने नफा-तोटयाचा हिशोब आमसभेतून जाहीर करावा असे आव्हान दिलेले आहे. प्रशासकीय समिती व कार्यकारी एमडी अनिल फडते यांचे पुर्णपणे डेअरीचा व्यवहाराकडे दुर्लक्ष होत आहे. पर्यटन हंगाम सुरू झाला असून सुद्धा पाहिजे तशी दुधाच्या विक्रीत वाढ झालेली नाही. प्रशासकीय समिती व कार्यकारी एमडी अनिल फडते यांना हटवून नवीन प्रशासक नेमावे किंवा दुध डेअरीची निवडणूक घेवून शेतकऱयाकडे दुध संघाचा ताबा द्यावा अशी मागणी दुध उत्पादकांनी केली आहे.

Related Stories

गटबाजी असली तरी यावेळी मडगावातून भाजपचाच विजय

Patil_p

उगे येथे तीन म्हशींची गोळय़ा झाडून हत्या

Amit Kulkarni

दोन मोबाईल चोरटय़ांना अटक

Omkar B

राष्ट्रीय जनता दल गोवाच्या अध्यक्षाचा राजीनामा

Amit Kulkarni

स्वातंत्र्यसैनिक फ. य. प्रभुगावकर यांचे निधन

Amit Kulkarni

जवाहर नवोदयची ‘ती’ मुले दिल्लीस रवाना

Omkar B
error: Content is protected !!