तरुण भारत

कित्येक पक्षांकडून संपर्क पण आहे तेथेच राहणार

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

माझ्याकडे कित्येक पक्ष कित्येक वर्षांपासून संपर्क करत आहेत. प्रसारमाध्यमे तर दर आठवडय़ाला दिगंबर कामत भाजपात जाणार व मुख्यमंत्री बनणार वा अन्य कोणत्या तरी पक्षात जाऊन मुख्यमंत्री बनणार अशा बातम्या छापत आलेली आहेत. पण मी आहे तेथेच आहे व आहे तेथेच राहणार, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केली.

राज्यात कित्येक नवीन पक्ष येऊन येथील राजकारण्यांना ऑफर देऊन आपल्या पक्षात प्रवेश देत आहेत. आपणासही अशी ऑफर असल्याचे बोलले जाते याकडे कामत यांचे लक्ष वेधून पत्रकारांनी त्यांचे मत जाणले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते मडगावात पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलत होते.

कामत यांच्या कट्टर समर्थक असलेल्या माजी नगरसेविका डॉरिस टेक्सेरा यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल कामत यांची प्रतिक्रिया जाणली असता ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेस कोणती जादू करत आहे ते कोणास ठाऊक. कालपासून युवक काँग्रेसच्या कार्यक्रमाच्यावेळी त्या आमच्यासोबत होत्या. त्या आपल्या जुन्या कार्यकर्त्या होत्या, असे त्यांनी सांगितले.

अलीकडेच पालिका निवडणुकीत टेक्सेरा यांचा प्रभाग राखीव झाल्याने कोंब येथील अन्य प्रभागात तिला पक्षाने उमेदवारी देऊन सामावून घेतले होते. मात्र त्या विजयी होऊ शकल्या नव्हत्या. टेक्सेरा यांनी आपणास अन्य पक्षाची ऑफर येत आहे याची कल्पना दिली होती. आपण चांगल्या-वाईटाचा विचार करून निर्णय घे एवढेच त्यांना सांगितले होते. आपण कुणाला अडवून ठेवू शकत नाही, असे कामत एका प्रश्नावर उत्तरले.

Related Stories

मुंबई सिटी एफसी आयएसएलच्या सातव्या मोसमाचे विजेते

Patil_p

अन्यथा आज दिगंबर कामत भाजपमध्ये असते-दामू नाईक

Omkar B

सरकारच्या गोमंतकीयविरोधी धोरणांना विरोध करण्याची गरज

Patil_p

कामत यांच्यामुळे काँग्रेसबरोबर भाजपच्या गोटातही खळबळ

Patil_p

म्हापशातील रंगकर्मी रंजन मयेकर यांचे कोविडमुळे निधन

Amit Kulkarni

प्रवास सागरच्या चित्रकलेचा

Patil_p
error: Content is protected !!